“मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं ते अर्धवटच”

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला. या भागातही उध्दव ठाकरे यांनी भाजपवर आणि शिवसेनेत बंड केलेल्या सर्व नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय … Read more

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरुन राणे पुत्रांची टीका; म्हणाले…

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोरांबरोबरच त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपवर टीका केली आहे. ही मुलाखत आज प्रकाशित झाल्यानंतर या मुलाखतीमधील ११ सेकंदांची क्लिप शेअर करत ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक असणारे केंद्रीय मंत्री नारायण … Read more

आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले….

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ असा उल्लेख करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना बंडखोरांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांना आदित्य ठाकरेंनी … Read more

दीपक केसरकर उडते पक्षी; किशोरी पेडणेकर आक्रमक

मुंबई : आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आल्या होत्या. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांच्यावर पेडणेकरांनी चांगलीच आगपाखड केली आहे. दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड … Read more

बंडखोरांना जागा दाखवण्याची भाषा करणाऱ्याच शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील

मुंबई : शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या आणि मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रेंच्या निर्णयाने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शीतल म्हात्रेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील निवासस्थानी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली आहे. शिंदे गटाच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणं … Read more

शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही- दीपक केसरकर

मुंबई : शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही … Read more

नारायण राणेंना शिवसेना सोडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली; सेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना सेनेत फूट पाहायला मिळाली होती. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली आहे, असा दावा दीपक केसरकरांनी … Read more

बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं; राऊतांची शिंदे गटावर टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटो शेअर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचे सांगत आहेत … Read more

‘विझणार कधीच अंगार नाही’ म्हणत मुख्यमंत्र्यांचे गुरूपौर्णिमेला बाळासाहेबांना विनम्र अभिवादन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात सत्तांतर झाल्याने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर वारंवार टीका केली जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आपण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे … Read more

“शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे ठाकरेंचंच, दम असेल तर स्वत:चा गट…”

मुंबई : भाजप सोबत सत्तास्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांना उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह “धनुष्यबाणावरून” मोठा वाद सुरू आहे. यावरुन शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहे .त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी … Read more

तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खदखद

मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून गप्प असलेले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन सुरु होताच शिवसेनेतील नेत्यांबाबतची खदखद व्यक्त केली. मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना सभागृह चांगलेच गाजवले. आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही. तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं, आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी … Read more

पक्ष सोडणाऱ्या अशीच भाषणं करावी लागतात; राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळाली. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता आणखीनच तीव्र होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणातून अनेक खुलासे करत शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. … Read more