सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्णय न घेण्याचे आदेश; शिवसेनेची नाराजी

मुंबई : शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले आहे त्याच्या मुळावर घाव … Read more

औरंगाबादच्या नामांतराला पवारांचा विरोध? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वीच्या ठाकरे सरकारने औरंगाबद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर असे केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काही माहिती किंवा चर्चा झाली नसल्याचे म्हंटले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की … Read more

राजभवनाचा वापर करुन भाजप-शिंदे सरकार लादलं; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. राज्यात भाजपसोबत हातमिळवणी करत शिदे गटाने सरकार स्थापन केले. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत … Read more

बंडखोरांविरोधात शिवसेनेची कठोर कारवाई; संतोष बांगर, तानाजी सावतांना पहिला फटका

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. आमदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आमदार परत न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे … Read more

तेव्हा लाज वाटली नाही; आदित्य ठाकरेंना गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षबांधणीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक पुन्हा लढा असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी … Read more

ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडला तेव्हा महिला रडत होत्या, त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील- संजय राऊत

नाशिक : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. अनेक विषयांवरुन सेनेमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. बंडखोरांनी रोखठोक भाष्य करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. संजय राऊत आज नाशिकमध्ये सभेसाठी गेले असून सभेमध्ये बोलताना बंडखोर आमदारांवर राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं … Read more

“शिवसेना आमच्याच बापाची, बंडखोरांना ५० खोके पचणार नाहीत”

नाशिक : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील वाद शिगेला पोहचला आहे. बंडखोरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संबंधित बंडखोर आमदार अद्याप आम्ही शिवसेनेत आहोत, असा दावा करत असले तरी शिवसेनत फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. ४० आमदार एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य … Read more

ठाकरे-शिंदेंनी एकत्र यावं, हीच आमची भूमिका; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. सध्या शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन वाद तु तु मै मै सुरु आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. त्यावरुन आता शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी वक्तव्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

ज्यांचं रक्त भगवं तो ठाकरेंसोबत; आदित्य ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी बंड केला आणि भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी निष्ठा यात्रेला सुरवात केली आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाला भेट देत आहेत. विरोधकांकडून बाकीचे आमदार देखील शिवसेनेला रामराम करतील असा दावा केला जात आहे. असा दावा करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी चांगलंच सुनावलं … Read more

ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत; राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच राणेंची टीका

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊतांना अटक वॉरंट जारी केल्यावरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे.   संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना अटक होणार. संजय राऊत … Read more

आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग…; राऊतांचं ४० बंडखोरांना आव्हान

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली आणि सरकार स्थापन केले. तत्पुर्वी शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केला. त्यावरुन शिवसेनेमध्ये मोठा वाद झाला. राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ झाली. आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोरांना चांगलच धारेवर धरलं. त्याला संजय राऊतांनी टोला लगावला आहे. शिवसेना पक्षाशिवाय बंडखोर आमदारांचे अस्तित्वच … Read more

एकनाथ शिंदे ‘त्या’ दिवशी तासभर रडले; बंडखोर आमदाराने केला खुलासा

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगितले आहे. बंडखोरीचे कारण शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना या निवडणुकांमधून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्षभरापासून एकनाथ शिंदेंसोबत जो प्रकार सुरु होता, त्यामुळे त्यांचा संताप झाला … Read more

‘धनुष्यबाण’ शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला आहे. उद्धव ठाकरेंनी नुकत्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे सरकार, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या आणि अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. माणसाची चिन्हंही लोक बघतात, लोक विचार करुन मतदान करतात. मागच्या काळात काय झालंय हे सांगितलं. याचा अर्थ चिन्ह सोडायचं असं … Read more

राज्यपाल घटनेचे पालन करणारे नाहीत; राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले खरे पण या दोन्ही शिंदे आणि ठाकरे गटामध्ये अनेक विषयांवरुन वाद झाले. या दोन्ही गटामध्ये सध्या निवडणूक चिन्हावरुन वाद सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे सरकार बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांनी … Read more

त्यांना आता ४० भोंगे मिळाले आहेत म्हणून…; राऊतांची भाजपवर टीका

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील बहुतांश शिवसैनिक हे शिंदे गटामध्ये जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील मोठा वाद सुरु आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला काही धक्का बसलेला नाही. येथून गेलेले … Read more

माझे सरकारला आव्हान आहे हिंमत असेल तर….; वसंत मोरेंचे थेट आव्हान

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार, एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारच्या काळातील निर्णयांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महाविकास आघाडीच्या निर्णयांमध्ये शिंदे सरकार बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या विषयावरुन मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी शिंदे सरकारला थेट आव्हान दिले … Read more

धनुष्यबाण आम्हालाच मिळणार; शंभूराजे देसाईंचा विश्वास

मुंबई : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावरुन मोठा वादंग सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना धनुष्याबाण असो अथवा इतर कोणतेही चिन्ह मिळाले तरी कंबर कसून हे चिन्ह घराघरात पोहचवण्याची तयारी ठेवा, असे आवाहन उद्धव … Read more

“आम्हाला बोलवायचे असेल तर भाजपलाही बोलवावं लागेल”

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपद घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले पण ३ पक्ष एकत्र म्हणजे अंतर्गत धूसपूस तर होणारच. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. राज्याच्या राजकारणाची नवी समीकरणं तयार झाली. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी … Read more