‘या’ गोष्टी ४८ तासात बंद न झाल्यास महिला करणार रास्तारोको

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  राहुरी फॅक्टरी परिसरामधील अवैध हातभट्टी दारू व्यवसाया बरोबरच खाजगी सावकारकी त्वरित बंद व्हावी या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर परिसरातील संतप्त महिलांच्या वतीने सोमवार दिनांक १२ जुलै रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे म्हटले आहे की,प्रसादनगर भागासह राहुरी फॅक्टरी परिसरात मोठ्या प्रमाणात … Read more

90 लाख फॉलोअर्स असणाऱ्या ‘तिने’ युट्युबवर केली एक चूक; थेट गेली तुरुंगात

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- सोशल मीडियावर वर्चस्व गाजविण्याच्या स्पर्धेत कंटेंट निर्माते आजकाल त्यांच्या अकाउंट्सवर काहीही शेअर करत आहेत. लाइक्स, कमेंट्स, व्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात लोक वादग्रस्त सामग्री पोस्ट करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. तथापि, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्वतःची मर्यादा असते आणि त्याद्वारे बनविलेले नियम मोडल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे. नुकताच मेक्सिकोमधील प्रसिद्ध यु … Read more

‘ह्या’ लोकांची सेक्स लाइफ असते जबरदस्त

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- सफल वैवाहिक आयुष्यामागे फक्त प्रेम असणे पुरेसे नसते. रिलेशनशिप एक्सपर्ट्स म्हणतात की प्रेम आणि विश्वास व्यतिरिक्त, संबंधात महत्त्वाची असलेली आणखी एक विशेष गोष्ट आहे. विवाहित जीवन आणखी आनंदी होण्यासाठी चांगल्या सेक्स सह जोडीदाराबद्दल कृतज्ञता दर्शविणे खूप महत्वाचे आहे. जर्नल ऑफ सोशल सायकोलॉजिकल अँड पर्सनालिटी सायन्समध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे … Read more

कोरोनाची लस देताना महिला करू लागली ‘असे’ काही; आजूबाजूचे लोकही घाबरले

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- देशभर कोरोना लसीकरण राबविले जात आहे. काही लोक लसीच्या नावाखाली घाबरत आहेत , तर काही लोक लस घेताना संपूर्ण घर डोक्यावर घेतात. एका महिलेला लस दिल्यानंतरचा एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. लस देताच महिला ओरडू लागली :- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या … Read more

नवरीने स्टेजवरच उघडले आलेले गिफ्ट ; बॉक्समध्ये पाहून उडाला चेहऱ्याचा रंग, व्हिडीओ व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- सोशल मीडियावर सध्या लग्नाचे अनेक व्हिडिओ खूप ट्रेंड होत आहेत. बदलत्या काळाबरोबर लग्नांचे वातावरणही खूप बदलले आहे. सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर लग्नाच्या मंचावर बसलेल्या वधू-वरांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पूर्वीप्रमाणे आता नववधू लाजून बसत नाहीत . आणि आधी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याची खात्री होईल.  नववधूने तिला आलेले … Read more

दारु अड्डयावर पोलिसांकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात नुकत्याच दारू अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असताना देखील पोलिसांनी आता पुन्हा या परिसरात छापे सत्र सुरू केले आहे. रविवारी गुहा तसेच देवळाली परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असून २७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील आजची अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७६ हजार ५३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले काळेबेरे केले त्यांनाच भीती !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मुळा प्रवराचे ५० हजार बिगर थकबाकीदार सभासद मतदानासाठी पात्र असून इतर थकबाकीदार सभासदांनी थकबाकीची रक्कम भरली, तर त्यांनाही मतदान करता येईल. शासनाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये सभासद रक्कम ५० रुपयांवरून २०० करण्यात आली. आता परत ती ५० रुपये करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे सभासदांच्या मतदानाच्या हक्कावर कोणताही परिणाम होणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पावसाचे तांडव, ओढ्या-नाल्यांना पूर; शेतीचे अतोनात नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, केसापूर, दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फूनगी, गंगापूर परिसरात पावसाचे दमदार आगमन झाले असून दुबार पेरणीचे संकट टळल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. रविवारी रात्री आंबी, अंमळनेर परिसरात पावसाचे तांडव नृत्य पहायला मिळाले. जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे, नाल्यांना पूर आल्याने ते दुथडी भरून वाहत आहेत. पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात … Read more

उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोव्हिडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले.  कोव्हिड काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोव्हिड काळात उत्पादन न थांबविता … Read more

प्रेरणादायी यशोगाथा शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाची वाट झाली सुकर…लग्नगाठी ही जुळाल्या…!

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करतांना रोजच्या जगण्याची भ्रांत होती. अशात उच्च शिक्षणाचा विचार करणं तर शक्य नव्हतं…मात्र सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाचे स्वप्नं तर साकार झालेचं ; पण आयुष्याचा जोडीदार ही मिळाला. ही गोष्ट आहे. अजित व तेजश्री उबाळे या तरूण दाम्पत्यांची. अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील ‘मोहजदेवडे’ … Read more

खा. सुजय विखे म्हणतात साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी ‘ही’ व्यक्ती असावी !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- खा. सुजय विखे म्हणतात साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी ‘ही’ व्यक्ती असावी ! जागासह देशात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तम प्रकारे उपाययोजना केल्या आहेत. त्या अन्य कोणत्याही पंतप्रधानाला करता येणे शक्य झाल्या नसत्या. त्यामुळे इंधन दरवाढीवरून मोर्चा काढण्यापेक्षा पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा द्या. … Read more

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका नगरच्या पाणी योजनेला बसला आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. पाणी योजनेच्या मुळानगर पंपिंग स्टेशन परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणी उपसा पूर्ववत होण्यास किमान तीन ते चार … Read more

सावधान : लाईट, मोबाईल नेटवर्क, GPS सिग्नल जाणार?, पृथ्वीला धडकणार विनाशकारी सौर वादळ

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- सूर्याच्या उर्जेपासून तयार झालेलं एक विनाशकारी सौर वादळ तब्बल 16 लाख किमी वेगाने पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसात हे वादळ पृथ्वीला धडकण्याची शक्यता असून त्यामुळे काही काळासाठी सॅटेलाईट सिस्टिम आणि इतर सेवा बंद पडू शकतात. या विनाशकारी सौर वादळामुळे रेडिओ सिग्नल, मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येणार असून काही … Read more

धक्कादायक ! घरात घुसून 29 वर्षीय मॉडेलची निर्घृण हत्या

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  पाकिस्तानमधील महिलांवरील गुन्हे थांबण्याचे नाव घेत नाहीत. लाहोरमध्ये घरात घुसून एका मॉडेलची निर्घृण हत्या करण्यात आली. 29 वर्षीय नायब नदीमची गळा आवळून खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. तथापि, या प्रकरणात त्यांनी जास्त बोलणे टाळले आहे. रविवारी नायबचा मृतदेह त्यांच्या डिफेन्स एरिया मधील घरातून मिळाला.  डिफेन्स एरियामध्ये भीतीचे … Read more

‘ही’ दाळ पुरुषांच्या समस्येसाठी आहे खूप फायदेशीर ; नियमित सेवन केल्यास अनेक आजार होतील दूर

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी बरेच लोक महागडे औषधे वापरतात. यानंतरही त्यांची तब्येत सुधारत नाही. यामागे आहार आणि खराब जीवनशैली हे कारण असल्याचे समोर आले आहे. आपणही शारीरिक दुर्बलतेला बळी पडले असल्यास ही बातमी आपल्या … Read more

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी संघ स्वयंसेवकांना खास ट्रेनिंग !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी संघाकडून देशव्यापी ‘कार्यकर्ता प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. यात प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक देशातील एकूण अडीच लाख जागांवर पोहोचून कोरोना संबंधिची जनजागृती करण्याचे काम करणार आहेत. स्वयंसेवक संघाच्या एकूण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 353 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –  संगमनेर – 36 अकोले … Read more