अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील आजची अधिकृत आकडेवारी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७६ हजार ५३० इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ७०७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५८ आणि अँटीजेन चाचणीत १७५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या

रुग्णामध्ये मनपा ११, नगर ग्रा. ०३, नेवासा ०२, पारनेर ०१, राहुरी ०१, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर ०१ आणि अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या

रुग्णामध्ये मनपा ०५, जामखेड २१, कर्जत ०७, कोपरगाव ११, नगर ग्रा.१४, नेवासा १२, पारनेर २६, पाथर्डी ०५, राहता ०४, राहुरी ०६, संगमनेर १८, शेवगाव १७, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १७५ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, जामखेड १६, कर्जत १२, कोपरगाव ०७, नगर ग्रा. ०७, नेवासा ०७, पारनेर ३५, पाथर्डी ३४, राहुरी ०३, संगमनेर १८, शेवगाव ०४, श्रीगोंदा २७ आणि श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले ०५, जामखेड २४, कर्जत ३०, कोपरगाव ०७, नगर ग्रा. ११, नेवासा ३६, पारनेर ५६, पाथर्डी ४१, राहता ०७, राहुरी २०, संगमनेर १५, शेवगाव १३, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर १६ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,७६,५३०
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२७०७
  • पोर्टलवरील मृत्यू नोंद:५९९१
  • एकूण रूग्ण संख्या:२,८५,२२८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

  • घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
  • प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
  • स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
  • अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा