T-20 वर्ल्ड कप भारतात नाही ह्या देशात होणार !

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  यंदाचा टी-20 वर्ल्डकप भारताऐवजी युएईमध्ये आयोजित करावा लागणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कळवले असल्याचेही ते म्हणाले. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत असला तरी कोरोनावर अजूनही पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. त्यामुळे खेळाडूंच्या आरोग्याचा … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील ‘त्या’ कंपनीकडे तब्बल 85 कोटींची थकबाकी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाकाळात अर्थचक्राला गती मिळावी यासाठी शासन प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे काही उद्योजकांकडून तसेच काही कंपन्यांकडून कोट्यवधींच्या रकमा थकीत ठेवण्यात येऊ लागल्या आहेत. असाच काहीसा कोट्यवधींचा थकबाकीचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील हरेगाव येथील बेलापूर इंडस्ट्रीज लि.,कंपनीकडे एकूण 85 कोटी 03 लाख 11 हजार 800 रुपये थकबाकी … Read more

आधार फाऊंडेशनच्या वतीने वृध्दाश्रमात किराणा साहित्याचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- आधार फाऊंडेशनच्या वतीने वृध्दाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करुन वयोवृध्दांना आधार देण्यात आला. महंत ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या आधार फाऊंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. टाळेबंदीनंतर नेवासा फाटा येथील शरणपूर वृध्दाश्रमात किराणा साहित्याची गरज भासत असताना आधार फाऊंडेशनच्या वतीने वृध्दाश्रमात किराणा साहित्यासह फळांचे वाटप … Read more

तरुणांनी व्यवसायाकडे वळावे : उदयन गडाख

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असताना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तरुणांनी विविध व्यवसायाकडे वळून करीअर निर्माण करावे, असे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी केले. ते गणेशवाडी ( ता. नेवासे) येथे एका कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कैलास दरंदले, गणेशवाडीचे सेवा सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय लोहकरे, डॉ. माऊली दरदले, … Read more

भटक्या विमुक्तांच्या आरक्षणासाठी आरपीआय माध्यमातून मोठा लढा उभारणार -सुशांत म्हस्के

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- भटके विमुक्त समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. त्यांना खर्‍या अर्थाने विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या घटकांना सामाजिक न्याय मिळू शकलेला नाही. भटक्या विमुक्तांच्या आरक्षणासाठी आरपीआय गवई गटाच्या माध्यमातून मोठा लढा उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ … Read more

राज्यातील ‘ते’ शिखर पर्यटकांसाठी बंद ! ‘या’ ग्रामपंचायतीचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  ट्रेकिंगचा छंद असलेल्या पर्यटकांसाठी काहीशी निराशाजनक बातमी आहे. ती म्हणजे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यातील सर्वात उंच कळसूबाई शिखर पुन्हा पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय बारी ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना या काळात कळसूबाई शिखरावर जात येणार नाही. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत … Read more

एका सेल्फीमुळे वडिल आणि मामा गमावले!

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- ओसंडून वाहणाऱ्या पाण्याजवळ जाऊन जीवघेणा सेल्फी काढण्याचा मोह अनेक पर्यटकांना आवरता येत नाही. मात्र, हे प्रकार पर्यटकांच्या जीवावर बेतत असल्याचे वारंवार समोर येत आहे. मागील काही वर्षांपासून तरुणांमध्ये मोबाईलवर सेल्फी काढण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु अनेकवेळा धोकेदायक ठिकाणी सेल्फी काढताना दुर्घटना देखील घडतात. पण त्यासोबतच … Read more

महिलांना पुढे करुन कोल्हे मला बदनाम करू पाहताहेत- नगराध्यक्ष वहाडणे

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  कार्यक्षम मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या निरोप समारंभातील माझे भाषण रेकॉर्ड केलेले आहे. माझ्या विरुद्ध बोलायला भाजपचे नगरसेवक कमी पडले म्हणून कि काय, आता महिलांना पुढे करुन कोल्हे मला बदनाम करू पाहत आहेत. तुमचे नगरसेवक तर तुमच्या धाकाने निरोप समारंभासही उपस्थित राहू शकत नाहीत. माजी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर याही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महापौरपद व उपमहापौर पदी ‘यांच्या’ निवडी फिक्स !

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले यांची निवड निश्चित झाली आहे. महापौर-उपमहापौर पदासाठी आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एकच अर्ज आल्याने महापौरपदी रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more

बापरे ! म्हणून संपूर्ण कुटुंबानेच केली आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- नागपूरमध्ये एकाच कुटूंबातील पाच जणांची हत्त्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्यामध्ये आई-वडील, तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. फळबागांचे पिक घेण्यास अपयश व डोक्यावर कर्जाचे ओझे वाढत असल्याने हे कृत्य … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार ?

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ह्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेदाची चिन्हे दिसू लागली आहेत. कृषिमंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नेवासा तालुक्यात झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सध्याचे पालकमंत्री मुश्रीफ त्यांच्याऐवजी शिवसेनेचे मंत्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीसोबत आक्षेपार्ह फोटो काढून महिनाभर बलात्कार..

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीसोबत आक्षेपार्ह फोटो काढून नंतर बदनामीची भीती दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . १९ मे ते १७ जूनदरम्यान नगर-सोलापूर रोडवरील लॉज व चांदबीबी महाल परिसरात ही घटना घडली. सोहेल अख्तर सय्यद (रा. मुकुंदनगर, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 411 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम    

अहमदनगरच्या राजकारणात काहीही घडू शकतं….

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरच्या राजकारणात शेवटपर्यंत काहाही घडू शकतं, असं वक्तव्य करून नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. आमच्याकडे महापौरपदासाठी उमेदवार नसला तरी वरिष्ठांनी निर्णय घेतला तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोणासोबतही जाऊ शकतो, असे म्हणत विखे यांनी नव्या समीकराणांचीही शक्यता व्यक्त केली आहे. विखे यांच्या … Read more

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या संपत्तीची

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या कडे असलेल्या अपसंपदेची आयकर खात्याने उघड चौकशी करावी, असे स्मरण पत्र जेष्ठ वकील अॅड.सुरेश लगड यांनी आयकर खात्याचे मुख्य आयुक्तांना दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीत हा बाळ बोठे हा झटपट (आर्थिक दृष्ट्या) मोठा झाला. बोठेची सुरवातीची आर्थिक परिस्थिती व … Read more

आधी बुक करा गॅस सिलिंडर, नंतर द्या पैसे ; जाणून घ्या आकर्षक ऑफर्स

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- भारतातील आघाडीचे डिजिटल वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमने आज आकर्षक ऑफर्स आणि कॅशबॅकसह नवीन फीचर्स आणून एलपीजी सिलिंडर बुकिंग अनुभवास नवीन बनवण्याची घोषणा केली आहे. आता यूजर्स पेटीएमद्वारे आयव्हीआर, मिस कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरुन होणाऱ्या बुकिंगसाठी पैसे भरू शकतात. हे फीचर त्यांना इतर कोणत्याही प्‍लेटफॉर्मद्वारे किंवा चॅनेलद्वारे सिलिंडर बुक करून … Read more

एफडीमध्ये पैशांची गुंतवणूक : बऱ्याच कमी लोकांना माहित आहेत ‘ह्या’ फायद्याच्या गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- तुम्ही आपतकालीन खर्चासाठी तुमच्या बचतीचा काही भाग बाजूला हाताशी राखून ठेवता, संपत्ती निर्मितीकरिता थोडी ढवळाढवळ चांगली वित्तीय सवय ठरते. यासाठी केवळ बचत खाते पुरेसे नाही, त्याद्वारे मिळणारा रिटर्न फारसा नसतो. वास्तविक महागाई वाढत असताना हा रिटर्न क्षुल्लकच असतो. अशा परिस्थितीत फिक्स डिपॉझिट एक चांगला पर्याय मानला जातो. परंतु … Read more

आत्ताच लग्न झालेय ? मग ‘असे’ करा आयुष्याचे आर्थिक प्लॅनिंग; म्हातारपण सुख-समाधानात जाईल

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- विवाहानंतर बरीच समीकरणे बदलतात. आयुष्याचे ध्येय बदलते, नवीन नाती तयार होतात. हे सगळे होत असताना आर्थिक समीकरणेही बदलतात. या आणि अशा अनेक बदलांमुळे आर्थिक गणिते बदलतात. हे बदल योग्य प्रकारे हाताळले गेले, तर त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होतो. पती-पत्नी दोघांनाही उद्याच्या काळासाठी समायोजित नियोजन करावे लागेल. उद्या चांगले … Read more