“संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली”

नवी दिल्ली : राज्यात नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) ३ आणि भाजपचे (BJP) ३ असे उमेदवार निवडून आले. मात्र भाजपने यावेळी जोर दाखवल्याचे दिसून आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या (Kirit … Read more

“शरद पवार देशाचे राष्ट्रपती होणार असतील तर मला आनंदच होईल”

मुंबई : महाराष्ट्रात (Maharshtra) नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली आहे. यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) वाकयुद्ध सुरु झाले आहे. भाजपकडून (BJP) शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. राज्य सभा निवडणुकीमध्ये भाजपने … Read more

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more

बिग ब्रेकिंग : महाविकास आघाडीला झटका ! अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबत मुंबई न्यायालयाने (Mumbai Court) मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चांगलाच झटका बसला असल्याचे बोलले जात आहे. राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे मत हे राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे असते. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी आघाडीच्या दोन आमदारांना राज्यसभा … Read more

“आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करू शकतात”

नाशिक : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सतत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर टीका करताना दिसतात. तर मध्यंतरी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये चांगलाच आरोप सत्राचा वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा सोमय्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, आमदारांचा (MLA) घोडेबाजार महाराष्ट्रात सुरू आहे. … Read more

आघाडीमधील नेते म्हणतात ..अकेला देवेंद्र क्या करेगा? तर चित्रा वाघ म्हणाल्या, तुमच्या तिघांचा धुर..

मुंबई : राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सतत टीका होत असते, मात्र भाजपकडून (BJP) देखील या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले जाते. आताही राज्यसभेच्या निवडणुकांवरुन सरकारमधील मंत्र्यांकडून फडणवीसांवर टीका होत आहे. ‘अकेला देवेंद्र क्या करगा,’ अशाप्रकारचे वक्तव्य सरकारमधील नेत्यांकडून होत आहे. त्यांच्या या विधानाचा आता भाजपच्या नेत्या चित्रा … Read more

तुमचे हे धंदे बंद करा, शिवसैनिक बांधिल नाहीत; रोहित पवारांना शिवसेना खासदाराचा इशारा

अहमदनगर : राष्ट्रवादीचे (Ncp) नेते व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना शिवसेना (Shivsena) खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी इशारा केला असून अहमदनगर जिल्हात दौऱ्यावर असताना त्यांनी कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले शिवसेना खासदार राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार (Sharad Pawar) … Read more

ब्रेकिंग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय मंत्र्याच्या घरावर ईडीचे छापे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमागे ईडी (ED) आणि आयकर विभागाचा (Income Tax) ससेमिरा चालू आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या सरकारी आणि खाजगी निवासस्थानांसह एकूण 7 ठिकाणी ईडीने आज सकाळी छापे टाकण्यास … Read more

“महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंडे साहेब, मोहिते पाटलांचं घर फोडलं”

मुंबई : भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर कडाडून निशाणा साधला आहे. यावेळी ओबीसी आरक्षणावरून (OBC reservation) भाजप चांगलीच आक्रमक असल्याचे दिसत आहे. भाजप च्या नेत्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीविरुद्ध आझाद मैदानावर मोर्चा (Morcha on Azad Maidan) काढला यावेळी पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास … Read more

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? कोणते स्पेअर पार्ट घातलेत, मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार..

सांगली : बारामतीचा (Baramati) गडी एवढा हुशार कसा? हे आपण मेल्यावर वर गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असे म्हणत शेतकरी मेळाव्यामधून आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपा (Bjp) आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांच्या विकास निधीतून … Read more

राज ठाकरेंचा पुण्यातून हल्लाबोल तर, अजित पवारांनी घेतला बारामतीत समाचार

पुणे : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुण्यामध्ये (Pune) सभा घेत भाषणादरम्यान, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व ठाकरे सरकार यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. यावर आज बारामतीत (Baramati) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

मलिकांचा राजीनामा का घेत नाही? धमकी पवारांची की दाऊदची? सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर डी- गॅंग सोबत संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) मध्ये आरोप सत्र सुरु आहे. आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही प्रश्न उपस्थित … Read more

सातबारा कोरा करु नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही

सोलापूर : भाजप (BJP) नेते गपिचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सोलापूरमधून महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच पडळकरांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आठवण करून दिली आहे. सदाभाऊ यांनी काढलेल्या आक्रोश महाराष्ट्राचा आणि जागर शेतकऱ्यांचा ही यात्रा काढली होती त्याची सांगता सभा सोलापूरमध्ये (Solapur) … Read more

भविष्यात किरीट सोमय्यांना लोक रस्त्यावर फटकावतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना भविष्यात लोक रस्त्यावर फटकावतील असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ते लडाखमधून (Ladakh) माध्यमांशी संवाद साधत होते. संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या आमच्या सहकार्‍यांवर कुटुंबावर तोंड फाटेपर्यंत बोलतात. माझ्या मुलींच्या नावाने वायनरी फॅक्टरी आहे असा आरोप केला, आम्ही अजून … Read more

फडणवीसांचे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न, त्यांच्या मालकांनी त्यांना वेळीच आवर घालायला हवा, नाहीतर…

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) लचका तोडण्याचे स्वप्न पाहिले, अशी थेट टीका आज सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवरती केली आहे. तसेच “शिवसेनेने (Shivsena) बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला. म्हणून आज मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्र दिल्लीपुढे (Delhi) न झुकता उभा आहे. फडणवीस व त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा … Read more

शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत व्यक्त केला विश्वास, म्हणाले, पुढील पाच वर्षात..

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असून सरकारबद्दल राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढील आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सत्ता कायम राखणार असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या शरद पवार जिल्हा दौऱ्यावर असून माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, पहिल्यांदाच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यात केंद्राचा इंधनावरील कर सर्वाधिक … Read more

गावोगावी जाऊन संघर्ष करा..सरकारचा बुरखा टराटरा फाडा.. ; ओबीसी आरक्षणावरून चंद्रकांतदादांचा घणाघात

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावरून भाजपने (Bjp) ठाकरे सरकार व महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल चढवला आहे. नुकतेच मुंबईत (Mumbai) भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या एका बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पुन्हा घाव घातला आहे. चंद्रकांतदादा म्हणाले, कोर्टाने लवकरात लवकर ट्रिपल टेस्ट करण्यास या सरकारला सांगितलं. पण या सरकारने कानाडोळा केला. ठरवून … Read more

भोंग्यांच्या प्रकरणातुन भाजपने राज ठाकरेंच्या हातून हिंदुत्वाचा गळा घोटलाय, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आक्रमक भूमिका कायम आहे, मात्र त्यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावरूनच मेळाव्याच्या निमित्ताने पुण्यात शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आले असता त्यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून भाजपवर (Bjp) गंभीर आरोप केले आहेत. तसेच राज ठाकरे … Read more