तुमचे हे धंदे बंद करा, शिवसैनिक बांधिल नाहीत; रोहित पवारांना शिवसेना खासदाराचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : राष्ट्रवादीचे (Ncp) नेते व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना शिवसेना (Shivsena) खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी इशारा केला असून अहमदनगर जिल्हात दौऱ्यावर असताना त्यांनी कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले शिवसेना खासदार राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार (Sharad Pawar) यांचे मोलाचे योगदान आहे. पवार कुटूंबाला मोठी परंपरा आहे. त्याची जान राजकारण करताना ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आमदार रोहित पवार यांनी दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत.

शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं की, आमदार रोहित पवार यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा.

त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये होणार्‍या विकास कामांमध्ये शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे. कीर्तिकर यांचा रोहित पवारांना इशारा शिवसेना पदाधिकार्‍यांनी ज्या तक्रारी केल्यात, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.

त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत असा इशारा गजानन कीर्तिकर यांनी दिला आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांच्या इशाऱ्याला रोहित पवार नेमकं काय उत्तर देतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षातले नेते आपल्याच मित्रपक्षांवर टीका करताना करत असतात.

अशातच शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला आहे. त्यामुळे रोहित पवार यावर काय बोलतील हे लवकरच समजेल.