Smartphone यूजर्स सावधान ! त्वरित डिलीट करा ‘हे’ 19 Android Apps नाहीतर ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Android Apps : तुम्ही देखील अँड्रॉइड स्मार्टफोन वापरात असला तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार पुन्हा एकदा अँड्रॉइड यूजर्सना डेटा लीकचा धोका निर्माण झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो एका अहवालात अशा 19 Apps ची यादी जाहीर करण्यात आली आहे ज्यामुळे अँड्रॉइड यूजर्सना डेटा लीकचा धोका निर्माण झाला आहे.

यामुळे तुम्ही देखील हे Apps वापरत असाल तर ताबडतोब डिलीट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.अलीकडे एका अँटी-मालवेअर कंपनीने संशोधन केले आणि लाखो वापरकर्त्यांना या अॅप्सपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चेतावणी दिली.

MalwareFox ने चेतावणी दिली आहे की हॅकर्ससाठी iOS पेक्षा Android डिव्हाइसमध्ये प्रवेश करणे सोपे आहे. सायबर गुन्हेगार सहसा वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये घुसखोरी करण्यासाठी मलिशियल अॅप्स वापरतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक अँड्रॉइड वापरकर्ते कोणतीही खबरदारी न घेता त्यांचा वापर करतात. या सर्व मलिशियल अॅप्समध्ये अॅडवेअर, स्पायवेअर आणि ट्रोजन असतात.

ही 19 अॅप्स ताबडतोब डिलीट करा नाहीतर

जर तुम्ही खाली सूचीबद्ध केलेले 19 मलिशियल अॅप्स ताबडतोब काढून टाकले नाहीत, तर ते तुमच्या फोनवर मलिशियल कोड किंवा फाइल टाकतील. ते शेवटी तुमच्या डिव्हाइसला इंफेक्ट करेल मग ते संगणक, लॅपटॉप किंवा Android फोन असो. या प्रकारच्या हॅकिंगचा उद्देश बँकिंग तपशील, पासवर्ड आणि वापरकर्ता ओळख गोळा करणे हा आहे.

अशा प्रकारे मालीशिअल अॅप तुमच्या फोनपर्यंत पोहोचते

सायबर गुन्हेगार Google Play Store वरून कायदेशीर अॅप डाउनलोड करून, कोड जोडून आणि Google Play Store वर पुन्हा अपलोड करून असे करतात. अॅप अपलोड करण्यासाठी ते नवीन नाव वापरतात. Autolycos, Joker स्पायवेअर आणि Harly Trojan हे काही सर्वात सामान्य Android अॅप मालवेअर आहेत.

मालवेअरफॉक्स म्हणाले, “जोकर एक स्पायवेअर आहे जो contact lists, एसएमएस आणि प्रभावित डिव्हाइसेसबद्दल माहिती गोळा करतो. जोकरकडे फोन मालकाच्या संमतीशिवाय प्रीमियम सेवांसाठी डिव्हाइसेसची नोंदणी करण्याची क्षमता देखील आहे.  Harly Trojan अयोग्यरित्या वापरकर्त्याच्या डिव्हाइसबद्दल डेटा मिळवते, विशेषतः मोबाइल नेटवर्कशी संबंधित डेटा.”

1. Android अॅप AUTOLYCOS मालवेअरने संक्रमित –

Vlog Star Video Editor.

Creative 3D Launcher.

Wow, Beauty Camera.

Gif Emoji Keyboard.

Instant Heart Rate Anytime.

Delicate Messenger.

2. Android अॅप JOKER स्पायवेअरने संक्रमित 

Simple Note Scanner.

Universal PDF Scanner.

Private Messenger.

Premium SMS.

Blood Pressure Checker.

Cool Keyboard.

Paint Art.

Color Message.

3. Android अॅप हार्ली ट्रोजनने संक्रमित –

Fare Gamehub and Box.

Hope Camera-Picture Record.

Same Launcher and Live Wallpaper.

Amazing Wallpaper.

Cool Emoji Editor and Sticker.

हे पण वाचा :- Top 3 Cheapest Electric Cars: ‘ह्या’ आहे सर्वात स्वस्त टॉप 3 इलेक्ट्रिक कार ! देतात 250 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज ; किंमत फक्त 4.5 लाख रुपये