मध्य रेल्वेने कोकणवासीयांना दिला दिलासा! उन्हाळ्याच्या सुट्टीत गर्दीमुळे सुरू केल्या 38 अतिरिक्त गाड्या,वाचा या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या मुलांच्या परीक्षा संपून उन्हाळ्याच्या  सुट्ट्या लागणार आहेत व यामुळे प्रवाशांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. सुट्ट्यांमध्ये गावी जाण्यासाठी अनेक जणांची लगबग सुरू असून प्रवासासाठी रेल्वेला मोठ्या प्रमाणावर पसंती प्रवाशांकडून दिली जाते व या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांना खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

या दृष्टिकोनातून गर्दी टाळता यावी व प्रवाशांना प्रवास सुखकर व्हावा याकरिता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्कीच या अतिरिक्त रेल्वे गाड्यांमुळे गर्दी कमी होऊन प्रवास सुलभ होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जात आहे.

आपल्याला माहित आहे की मुंबईवरून सुट्टीच्या कालावधीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन या मार्गावर 38 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 कोकणात धावणार विशेष रेल्वेगाड्या

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्य रेल्वेच्या माध्यमातून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 38 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम पर्यंत 36 त्रीसाप्ताहिक वातानुकूलित विशेष गाड्या तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

या गाड्यांचे वेळापत्रक बघितले तर यामध्ये 01017 एसी विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 26 एप्रिल ते 4 जून पर्यंत दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी थिविम या ठिकाणी पोहोचेल.

तसेच गाडी क्रमांक 01018 ही वातानुकूलित विशेष थिविम येथून 27 एप्रिल ते पाच जून पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी दुपारी चार वाजून 35 मिनिटांनी निघेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.

 या गाड्यांना कोणत्या ठिकाणी आहेत थांबे?

या विशेष रेल्वे गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड हे थांबे या गाडीला असतील.