BSNL : 108 गावांमध्ये मोफत मिळणार इंटरनेट सेवा…छत्तीसगड सरकारने बीएसएनएलशी केली हातमिळवणी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL : नक्षलग्रस्त गावांमध्ये हायस्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी छत्तीसगड सरकारने सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सोबत भागीदारी केली आहे. यामुळे 108 गावांतील लोकांना वाय-फायच्या माध्यमातून मोफत इंटरनेट मिळणार आहे.

यासोबतच लोकांना कॉलिंगसह संवादाशी संबंधित इतर सुविधाही दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत बस्तरचे जिल्हाधिकारी चंदन कुमार आणि बीएसएनएलचे महाव्यवस्थापक शरद चंद्र तिवारी यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे.

bsnl

बस्तर कनेक्ट उपक्रमांतर्गत इंटरनेट उपलब्ध होईल

बस्तर कनेक्ट उपक्रमांतर्गत सरकार आणि बीएसएनएल यांच्यात एक करार झाला आहे. या करारामुळे बस्तर डेव्हलपमेंट ब्लॉकच्या 73 गावांमध्ये आणि टोकपालच्या 35 गावांमध्ये इंटरनेट देण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेचाही विकास होईल.

ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याची ही पहिलीच वेळ असेल, असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे ई-गव्हर्नन्स तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती मिळण्यास मदत होईल. याशिवाय बस्तर कनेक्ट उपक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

https://twitter.com/DPRChhattisgarh/status/1578412500261179392?s=20&t=iM3KpWqN43E_QvFBltEZcQ

BSNL 4G लाँच

दूरसंचार कंपनी BSNL ने 4G लाँच करण्यासंदर्भात गेल्या आठवड्यात मोठी घोषणा केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 4G सेवा नोव्हेंबरमध्ये लॉन्च केली जाईल, जी पुढील वर्षी 15 ऑगस्टला तंत्रज्ञान आणि गॅजेट्सच्या मदतीने 5G सेवेमध्ये बदलली जाईल.

कंपनीला विश्वास आहे की 4G च्या आगमनाने, अधिकाधिक वापरकर्ते त्यांच्याशी जोडले जातील. त्याचवेळी Jio, Airtel आणि Vi यांच्यातही तगडी स्पर्धा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 कार्यक्रमात 5G सेवा अधिकृतपणे लॉन्च केली. त्यानंतरच जिओ आणि एअरटेलनेही त्यांची 5जी सेवा सुरू केली.