Google Pixel 8 : गुगलच्या नवीन सीरिजची लाँच डेट आली समोर, काय असणार खासियत? जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Pixel 8 : भारतीय बाजारात सॅमसंग, विवो, रेडमी आणि ओप्पो यांसारख्या स्मार्टफोनप्रमाणे गुगलच्या स्मार्टफोन्सलाही मोठ्या प्रमाणात असते. कंपनीही आपले नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. त्यातील काही स्मार्टफोनच्या किमती कमी असतात तर काहींच्या किमती जास्त असतात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या नवीन Pixel सीरीज फोन Google Pixel 8 बद्दल माहिती समोर आली आहे. अशातच आता Google Pixel 8 स्मार्टफोनचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाँच झाल्यानंतर हा फोन इतर टेक कंपन्यांसोबत स्पर्धा करेल. गुगलचा हा सर्वात जास्त शक्तिशाली स्मार्टफोन असणार आहे. अनेकजण या फोनच्या लाँचची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आता गुगलचा नवीन स्मार्टफोन Google Pixel 8 शी संबंधित लीक समोर येत आहेत. याबाबत EZ नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो पिक्सेल 8 प्रोमो व्हिडिओ असल्याचे कथित आहे. शेअर करण्यात आलेल्या 14 सेकंदाचा व्हिडिओ नवीन ‘ऑडिओ मॅजिक इरेजर’ दाखवत आहे.

वापरकर्त्यांना मिळेल हा कलर पर्याय

या प्रोमोमध्ये Google Pixel 8 चे वर्णन “ऑडिओ मॅजिक इरेजर असणारा एकमेव फोन” असे करण्यात आले आहे. एवढेच नाही तर प्रोमोमध्ये गुगल पिक्सेल 8 सीरीजचा ब्लू कलर ऑप्शन दिसत आहे.

जाणून घ्या फीचर्स (अपेक्षित)

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार गुगलची आगामी Google Pixel 8 सीरिज दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येईल, एक म्हणजे 128GB स्टोरेज पर्याय आणि दुसरा म्हणजे 256GB स्टोरेज पर्याय. तसेच तो Android 14 आणि Tensor G3 प्रोसेसरवर काम करू शकतो.

बॅटरीबाबत बोलायचे झाले तर कंपनीच्या आगामी Pixel 8 मध्ये 24W वायर्ड चार्जिंग आणि 12W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट असणारी शक्तिशाली 4,485mAh बॅटरी मिळेल. तसेच Pixel 8 Pro 27-W वायर्ड फास्ट चार्जिंगसाठी समर्थनासह 4,950mAh बॅटरी मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा की कंपनीकडून Google Pixel 8 सीरिजची लॉन्च तारीख, किंमत आणि फीचर्स अधिकृतपणे उघड करण्यात आली नाहीत.