Instant Water Heater: 1 मिनिटांमध्ये पाणी गरम करा आणि हिवाळ्यात मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ करा! वाचा किती आहे या इन्स्टंट वॉटर हिटरची किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Instant Water Heater:- सध्या हिवाळ्याचा कालावधी चालू असून अंगाला हुडहुडी भरेल अशी थंडी आणि चोहोकडे धुक्याची चादर पसरल्याची सद्यस्थिती आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी बरेच जण अनेक प्रकारचे उबदार कपडे या दिवसांमध्ये वापरतात. परंतु सकाळी सकाळी आंघोळ करायची असेल तर मात्र गरमागरम पाणी राहिले तर मनाला खूप बरे वाटते.

त्यामुळे आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी बऱ्याच युक्त्या अवलंबल्या जातात. बऱ्याच घरांमध्ये त्याकरिता गिझरचा  वापर केला जातो. परंतु गिझरचा जास्त वापर केल्याने विज बिल जास्त प्रमाणात येण्याची शक्यता देखील असते. तसेच गिझर इन्स्टॉलेशन करिता जागा देखील लागत असल्याने कधी कधी जागेच्या अभावी देखील बऱ्याच ठिकाणी गिझर लावता येत नाही.

तसेच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सरपणाचा वापर करून मातीच्या चुल्यावर पाणी गरम केले जाते. मग अशावेळी पाणी गरम करण्यासाठी कोणती युक्ती वापरावी किंवा कोणत्या उपकरणाचा वापर करावा अशा प्रकारची समस्या निर्माण होते. या समस्येवर काय उपाय करता येईल? याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

तुमच्या बजेटमध्ये येईल पाणी गरम करण्यासाठीचे इन्स्टंट वॉटर हिटर

जर तुम्हाला घराच्या टाकीतून गरम पाणी हवे असेल तर तुम्ही एक हजार रुपये किमतीचे हे साधे उपकरण बसवू शकतात. हे उपकरण तुमच्या नळाजवळ इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी खर्चात व सोप्या पद्धतीने गरम पाणी वापरता येईल.

याकरिता तुम्ही हिवाळ्यात 100 लिटर कॅपॅसिटीचे इन्स्टंट वॉटर हिटर बसवू शकतात. ज्याप्रमाणे नळाची टॅप असते त्या टॅप सारखेच हे दिसते. अगदी तुम्ही तुमच्या घराच्या किचनमध्ये व बाथरूम मध्ये देखील याला इन्स्टॉल करू शकतात. या इन्स्टंट वॉटर हिटरची तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने बाजारातून करू शकतात.

 किती आहे या इन्स्टंट वॉटर हिटरची किंमत?

तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने हे इन्स्टंट वाटर हिटर खरेदी करायचे असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन यासारख्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतात. जर तुम्ही या इन्स्टंट वॉटर हिटरची किंमत पाहिली तर ती अगदी परवडण्याजोगी  असून तुम्हाला अगदी 1000 ते 2000 रुपये किंमतीच्या दरम्यान हे मिळू शकते.

तसेच काही ऑफर असेल तर तुम्ही सवलतीत देखील याची खरेदी करू शकता. यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या चांगल्या ब्रँडचे वॉटर हीटर्स ऑनलाईन उपलब्ध आहेत. एखाद्या चांगल्या खरेदी ऑफरच्या साह्याने तुम्ही या इन्स्टंट वॉटर हिटरची खरेदी अगदी हजार रुपयांमध्ये देखील करू शकतात.

 काय आहेत या इन्स्टंट वॉटर हिटरची वैशिष्ट्ये?

जर आपण या इन्स्टंट वॉटर हिटरचे वैशिष्ट्ये पाहिले तर हे एखाद्या टॅप सारखे दिसते. तुम्ही त्याला कुठेही  बसवू शकतात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एलईडी डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे व या माध्यमातून तुम्ही तापमान तपासू शकतात.

डिस्प्लेमध्ये दाखवलेला जो काही जलद इलेक्ट्रिक नळ आहे त्याच्या मदतीने तुम्ही तापमान देखील नियंत्रित करू शकतात. अशा पद्धतीने वापरायला सोपे असलेले हे इन्स्टंट वॉटर हिटर तुम्ही घरात बसवून मिनिटांमध्ये गरम पाणी मिळवू शकतात.