iQOO Z7s 5G : 64MP कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसर! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा हा फोन, वाचतील तुमचे पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iQOO Z7s 5G : सध्या Amazon वर एक सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्ही उत्तम फीचर्स असणारे स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. iQOO Z7s 5G हा फोन तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता.

कंपनीच्या या फोनची मूळ किंमत 23,999 रुपये इतकी आहे. परंतु सेलमध्ये, तुम्हाला 33% डिस्काउंटनंतर हा फोन 15,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला या फोनची किंमत 14,700 रुपयांनी कमी करता येईल. कंपनी या फोनवर 1,000 रुपयांची बँक सवलत देत आहे.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या या फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.38 इंच फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्याचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz असून या AMOLED डिस्प्लेमध्ये 1300 nits ची शिखर ब्राइटनेस पातळी मिळेल. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 8 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे.

कंपनीचा हा फोन स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर काम करत असून फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 64-मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह 2-मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा असून कंपनी सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणारा हा फोन 4500mAh बॅटरीसह येतो. ही बॅटरी 44 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असून हा फोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करेल. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक पर्याय दिले आहेत. हा फोन नॉर्वे ब्लू आणि पॅसिफिक नाईट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.