कार,विजेचे मीटर, फ्रिज इत्यादी उपकरणे जोडले जातील तुमच्या मोबाईलशी! खराब होण्याची शक्यता असल्यास तुम्हाला मिळेल मोबाईलवर अलर्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होत असून तंत्रज्ञानाच्या वापराने अनेक अवघड कामे आता सोपी झालेली आहेत. विशेष म्हणजे तुम्ही अगदी घरबसल्या अनेक कामे अगदी आरामात पार पाडू शकतात. आपल्या हातात स्मार्टफोन हा अशाच एक प्रकारच्या तंत्रज्ञानाची मोठी भेट आहे.

स्मार्टफोनच्या मदतीने आपण अनेक कामे आता घरबसल्या करतो. याच हातातला स्मार्टफोनला आता  कार, घरातील विजेचे मीटर, फ्रिज, एसी तसेच मायक्रोवेव्ह इत्यादी उपकरणांना जोडले जाणार आहे. त्यामुळे आता नेमका यामुळे काय फायदा मिळेल? याची माहिती आपण बघू.

 विजेचे मीटर,एसी आणि फ्रिज त्याचं उपकरणे फोनशी जोडले जाणार

समजा तुमचे कारचे मायलेज कमी झाले आहे किंवा कुलिंग सिस्टम काम करत नसेल, कारचे टायर जुने झालेले असतील किंवा घरातील वीज मीटरद्वारे विजेचा वापर तीन पटीने वाढला असून त्यामुळे विज बिल 5000 रुपयापेक्षा जास्त असेल अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला आता फोनवर मिळतील.

समजा एखाद्या व्यक्तीने जर सीसीटीव्ही कॅमेराशी काही छेडछाड केली तर त्याबद्दल अलर्ट करणारा मेसेज देखील तुम्हाला तुमच्या फोनवर आता मिळेल. लवकरच या गोष्टी आता आपल्या जीवनाचा भाग बनणार आहेत. कारण भारतातील जेवढ्या दूरसंचार कंपन्या आहेत त्या कार, वीज मीटर, फ्रिज,

एसी, मायक्रोवेव्ह व गॅस पाण्याच्या मीटरला मोबाईलशी जोडण्याची तयारी करत आहेत. यासाठी ट्रायने अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी मशीन टू मशीन कम्युनिकेशन करिता 85 पानांचे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामध्ये विदेशात बनलेल्या कार, ग्राहक उपयोगी वस्तू आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित जे काही साधने आहेत त्यांना देशातील दूरसंचार नेटवर्क शोधण्याचे नियम व अटींचा समावेश करण्यात आलेला आहे.

 यामध्ये कोणती यंत्रे जोडली जातील?

1- यामध्ये घर व उद्योग व्यवसायातील स्मार्ट वीज व पाणी मीटरची स्थिती काय आहे याची माहिती होईल.

2- पेमेंट करणारे पॉस अर्थात वायरलेस पॉईंट ऑफ सेल किंवा स्वॅप यंत्रे

3- घर व सोसायटी करिता निगराणी व्यवस्था, अग्निशमन व चोरी रोखण्यासाठी अलार्म सिस्टम देखील फोनशी जोडता येईल.

4- आरोग्यावर देखरेख ठेवता यावी याकरिता आजारी लोकांच्या शरीरात स्मार्ट बॉडी सेंसर

5- तसेच स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, गेमिंग कन्सोल आणि पिक्चर फ्रेम

6- वाहन खराब झाल्यास अलर्ट

 कशी काम करेल ही यंत्रणा?

यामध्ये दूरसंचार कंपन्यांच्या माध्यमातून सदर यंत्रांकरिता मोबाईल जोडणी देण्यात येतील. यामध्ये स्वतंत्र असे सिम नसेल परंतु एम्बडेड सिम अर्थात ई सिम असणार आहे व ते यंत्रामध्ये जोडलेले असेल. दूरसंचार कंपन्या या ई सिमची आपल्या नेटवर्क नोंदणी करतील. सिम चा क्रमांक 13 अंकांचा असेल व यामध्ये यंत्रांकरिता 3,

यंत्र परवान्याचे चार अंक व इतर सहा अशाप्रकारे यंत्राचे क्रमांक असतील.यामध्ये कंपन्यांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. म्हणजेच दूरसंचार कंपन्यांऐवजी यंत्रांच्या कंपन्यांना या यंत्रांना नियंत्रित करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु यामध्ये अट अशी आहे की कंपन्यांना त्याकरिता ट्रायच्या मॅनेजर सेक्युअर रुटींगकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.

 सर्किट कार्डने सिमला जोडले जाणार

तुम्ही देखील सिमच्या माध्यमातून संदेश पाठवू शकणार आहात. तसे पाहायला गेले तर बाजारामध्ये जास्तीत जास्त उपलब्ध असणाऱ्या गाड्यांमध्ये ई सिम आहे. यामुळे कारच्या प्रत्येक हालचालीची माहिती फोनवर मिळते.

कारची बॅटरी संपली, चार्जिंग पूर्ण झाली तरी देखील त्या संबंधीचा मेसेज फोनवर मिळतो. ई सिम एक मॅन्युफॅक्चर पार्ट असून ते एम्बेडेड युनिव्हर्सल इंटिग्रेटेड सर्किट कार्ड सॉफ्टवेअरच्या मदतीने दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांशी जोडलेले असते व त्यामुळे चांगली सेवा मिळू शकते.