OnePlus Ensemble Bundle : वनप्लसची पैसा वसूल ऑफर! अवघ्या 4500 रुपयात OnePlus 11, Pad, Buds Pro 2 खरेदी करता येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Ensemble Bundle : वनप्लस बाजारात सतत आपली नवनवीन उत्पादने घेऊन येत असते. इतर कंपन्यांच्या उत्पादनांपेक्षा वनप्लसची उत्पादने महाग आणि चांगल्या दर्जाची असतात. त्यामुळे अनेकांना बजेट कमी असल्यामुळे ही उत्पादने खरेदी करता येत नाहीत.

जर तुम्ही वनप्लसचे चाहते असाल आणि तुम्हाला स्वस्तात कंपनीची उत्पादने खरेदी करायची असतील तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कंपनीने एक ऑफर आणली असून या अंतर्गत तुम्ही 4,500 रुपये प्रति महिना EMI भरून OnePlus 11, Pad, Buds Pro 2 खरेदी करू शकता.

जाणून घ्या OnePlus Ensemble ची किंमत

किमतीचा विचार केला तर याची किंमत 1,07,997 रुपयांपासून सुरू होते, ज्यात तुम्हाला 4,000 रुपयांची झटपट सवलत मिळेल. ज्याचा लाभ तुम्हाला ICICI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच OneCard द्वारे सहज घेता येईल. त्याशिवाय तुम्हाला ICICI, Axis, Citi, SBI, HDFC बँका आणि OneCard कडून क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 24 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआयचा लाभ घेता येईल.

ऑफलाइन खरेदी करता येईल का?

हे बंडल तुम्हाला OnePlus Experience Stores वर खरेदी करता येईल. OnePlus Nizam Palace, Hyderabad, OnePlus Boulevard, Bengaluru, OnePlus Experience Store, Phoenix Mall, चेन्नई, OnePlus Experience Store, High Street Phoenix, मुंबई तसेच OnePlus Experience Store, Park Street , कोलकाता आणि वनप्लस एक्सपिरियन्स स्टोअर, फिनिक्स पॅलेसिओ, लखनौ येथून तुम्हाला ते खरेदी करता येईल. लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या.

विशेष ऑफर 

OnePlus 11 5G – इटरनल ग्रीन, 16 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज तसेच वनप्लस बड्स प्रो 2 – आर्बर ग्रीन; वनप्लस पॅड – हॅलो ग्रीन, 8GB 128GB आणि 12GB रॅम 256GB स्टोरेज हे या ऑफरचा भाग आहे.

त्याशिवाय OnePlus 11 5G 16GB व्हेरिएंटची 61,999 रुपयांना विक्री केली जात आहे. OnePlus Buds Pro 2 10,999 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. तर OnePlus Pad ची 39,999 रुपयांना विक्री केली जात आहे.