OnePlus Smart TV : 10 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह खरेदी करा 40 इंचाचा ‘हा’ भन्नाट स्मार्ट टीव्ही; फीचर्स आहे बेस्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Smart TV : जर तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका भन्नाट स्मार्ट टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हा स्मार्ट टीव्ही 40 इंचाचा असून तुम्ही हा स्मार्ट टीव्ही तब्बल 10 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात कोणता स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो हा स्मार्ट टीव्ही OnePlus चा आहे. जे ग्राहकांना कोणत्याही एक्सचेंज ऑफरशिवाय 18 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे. 30% पेक्षा जास्त फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, बँक कार्डद्वारे टीव्हीवर अतिरिक्त सवलतींचा लाभ घेता येतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये ग्राहकांना अल्ट्रा-थिन बेझल्ससह बेस्ट डिस्प्ले आणि बेस्ट ऑडिओ आउटपुट मिळतो.

ऑफर्स

OnePlus Y1 40 इंच Smart TV (40FA1A00) फ्लिपकार्टवर 27,999 रुपयांसह विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे मात्र तुम्ही 32%डिस्काउंटसह हा स्मार्ट टीव्ही 18,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. सिटी बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यावर या टीव्हीसाठी रु. 1,000 ची सवलत मिळत आहे. याशिवाय सिटी बँक किंवा आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे ईएमआय व्यवहारांवर 1500 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. तसेच, Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक दिला जात आहे. ग्राहकांची इच्छा असल्यास, ते जुन्या स्मार्ट टीव्हीच्या बदल्यात 11,750 रुपयांपर्यंतच्या एक्स्चेंज डिस्काउंटचाही लाभ घेऊ शकतात.मात्र एक्सचेंज सवलत जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते.

OnePlus Y1 Smart TV फीचर्स

OnePlus च्या प्रीमियम स्मार्ट टीव्हीमध्ये फुल एचडी (1920×1080 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 240nits पीक ब्राइटनेससह 40-इंचाचा डिस्प्ले आहे. क्रिस्प आणि क्लियर कलरआउटपुटसाठी या डिस्प्लेमध्ये गामा पिक्चर इंजिन देखील उपलब्ध आहे. पावरफुल ऑडिओ आउटपुटसाठी, डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह 20W क्षमतेचे दोन स्पीकर प्रदान केले आहेत.

कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये दोन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट आणि बिल्ट-इन WiFi सारखे पर्याय आहेत. स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉईड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे आणि गुगल असिस्टंटशी बोलूनही कमांड्स देता येतील. हा टीव्ही अलेक्सा सुसंगत आहे आणि क्रोमकास्टला देखील सपोर्ट करतो. हे Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मला देखील समर्थन देते.

 खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :- Jio Recharge Plan : जिओने आणला नवा प्लान ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळणार संपूर्ण वर्षासाठी फ्री कॉलिंगसह डेटा