Traffic Rule: तुम्हाला माहित आहेत का ‘हे’ तीन महत्त्वाचे वाहतुकीचे नियम? यामध्ये तुम्हाला पोलीस नाही देऊ शकत त्रास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Traffic Rule:- जेव्हा आपण रस्त्यावर वाहन चालवतो तेव्हा आपल्याला वाहतुकीचे नियम पाळणे खूप गरजेचे असते. कारण प्रवास करत असताना किंवा वाहन चालवत असताना वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी ही दुसऱ्यासाठी आणि स्वतःच्या जीविताच्या रक्षणासाठी देखील महत्त्वाचे असते.

या वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याकरिता ज्या काही  यंत्रणा असतात यामध्ये वाहतूक शाखा म्हणजेच वाहतूक पोलीस यांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन चालकांवर संपूर्णपणे लक्ष असते

परंतु दिवसेंदिवस आता वाहन चालकांची किंवा वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे प्रत्येक वाहन चालकावर लक्ष ठेवणे कर्मचाऱ्यांना कठीण होते. तसेच काही वेळा पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाहन चालकांना काही बाबतीत नाहक त्रास देण्याच्या घटना देखील घडतात.

या सगळ्या गोष्टी समोर ठेवून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम जारी करण्यात आलेले आहेत व ते वाहन चालकांसाठी माहीत असणे खूप गरजेचे आहे. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण वाहतुकीचे काही महत्त्वाचे नियम पाहणार आहोत जे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

 प्रवास करताना आता कागदपत्रांची हार्ड कॉपीची गरज नाही

वाहन चालकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पीयुसी अर्थात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्रांची हार्ड कॉपी म्हणजेच भौतिक कागदपत्रे सोबत बाळगण्याची अजिबात गरज नाही. कारण आता वाहतूक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या काही एजन्सी आहेत

म्हणजेच वाहतूक पोलीस वगैरे यांना वाहन चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा डीजी लॉकर किंवा एम परिवहन एप्लीकेशनद्वारे दर्शवलेले कोणतेही कागदपत्र स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कारण या एप्लीकेशन मध्ये ड्रायव्हर किंवा वाहनाचा संपूर्ण तपशील असतो.

त्यामुळे वाहतूक पोलिसांना ही कागदपत्रे डिजिटल पद्धतीने सहजपणे पाहता येऊ शकतात. त्यामुळे आता वाहन चालकांना अशा कागदपत्रांच्या हार्ड कॉफी म्हणजेच भौतिक प्रत दाखवण्याची गरज नाही.

 परंतु वाहन चालकाकडे मोबाईल नसेल तर

तुम्हाला डीजी लॉकर किंवा एम परिवहन एप्लीकेशनच्या माध्यमातून डिजिटल कागदपत्रे दाखवलेत तरी आता वाहतूक पोलीस तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही. परंतु बऱ्याचदा वाहन चालकाकडे अँड्रॉइड मोबाईल नसतो किंवा मोबाईलच नसतो. अशावेळी वाहनचालक पोलिसांना कागदपत्रांची डिजिटल कॉपी दाखवू शकत नाही.

अशी जर वेळ आली तर वाहतूक कर्मचारी किंवा वाहतूक पोलीस त्यांच्या मोबाईल मधील एम परिवहन किंवा इ चलन ॲपवर ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादीचा तपशील किंवा वाहन नोंदणीचा तपशील तपासू शकतात. याकरिता कर्मचारी त्यांच्या मोबाईल मधील ॲप्लिकेशनमध्ये वाहनाचा क्रमांक टाकून संपूर्ण माहिती मिळवू शकतात.

 चलन भरण्याची सुविधा

जर एखाद्या वाहन चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर त्याला चलन दिले जाते. यामध्ये वाहतूक पोलीस गुन्ह्याच्या आधारे ई चलान पाठवतात. वाहन चालक हा दंड राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले विविध ऑनलाइन एप्लीकेशन किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये असलेल्या चलन काउंटर द्वारे भरू शकतात.

परंतु अशा प्रकारचा दंड जर ई चलन पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून भरले तर ते फायद्याचे ठरते. जर अशा पद्धतीने पेमेंट केले तर ते पेमेंट ताबडतोब केले जाते व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था म्हणजे पोलिसांकडून तुम्हाला पोचपावती देखील लवकर मिळेल.