Technology News Marathi : फक्त ५८०० रुपयांत घ्या iPhone 13 च्या डिझाईनचा फोन, लॉन्च झाला आहे , फीचर्स पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Technology News Marathi : आयफोन (IPhone) घेण्याची हौस प्रत्यकाची असते. मात्र ब्रँडेड (Branded) मोबाईलची (Mobile) किंमतही तशीच आहे. त्यामुळे सर्वसाधारण हा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत नाहीत.

अशा परिस्थितीत एका कंपनीने आयफोनसारखा दिसणारा फोन लॉन्च (Lounch) केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ६ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. चायनीज ब्रँडने LeTV Y1 Pro लॉन्च केला आहे, जो iPhone 13 प्रमाणे डिझाइनसह येतो.

हे एंट्री लेव्हल डिव्हाइस (Entry level device) आहे. यामध्ये Unisoc T310 प्रोसेसर, 4GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज पर्याय आहे. चला जाणून घेऊया कंपनीच्या परवडणाऱ्या हँडसेटची किंमत आणि वैशिष्ट्ये.

LeTV Y1 Pro किंमत

ब्रँडने हा फोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. तिन्ही प्रकार 4GB RAM सह येतात. ब्रँडने हे उपकरण चीनच्या बाजारपेठेत लॉन्च केले आहे. स्मार्टफोनच्या 4GB RAM + 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 499 युआन (सुमारे 5,800 रुपये) आहे.

त्याच वेळी, त्याच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 699 युआन (सुमारे 8,510 रुपये) आहे. LeTV Y1 Pro च्या 4GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ८९९ युआन (सुमारे 10,500 रुपये) आहे. मिडनाईट ब्लॅक, स्टार ब्लू आणि स्टार व्हाइट कलरमध्ये हा डिवाइस लॉन्च करण्यात आला आहे.

फीचर्स काय आहेत?

ड्युअल सिम सपोर्ट असलेला LeTV Y1 Pro स्मार्टफोन Android ११ वर काम करतो. यात 6.5-इंचाचा LCD HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये Unisoc T310 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन 4GB रॅम सह येतो. यात 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे. फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

त्याचा प्राथमिक कॅमेरा 8MP आहे, जो AI लेन्ससह येतो. समोर कंपनीने 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 4000mAh बॅटरी दिली गेली आहे, जी 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यात USB Type-C चार्जिंग पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला नाही.