Cyclone Update: ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात पडेल का अवकाळी पाऊस? काय म्हणते याबाबतीत हवामान खाते?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cyclone Update:- यावर्षी महाराष्ट्रमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. पावसाच्या अभावाने खरीप हंगाम बऱ्याच प्रमाणात वाया गेलेला आहे व आता रब्बी हंगामाची स्थिती देखील कशा पद्धतीची राहिल याबाबत खूप मोठा प्रश्न उभा आहे. त्यातच मान्सूनने एक्झिट घेतली आहे. महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

या सगळ्या वातावरणामध्ये बंगालच्या उपसागराच्या उत्तर क्षेत्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र व चक्रीवादळ तयार झालेले आहे. त्यामुळे आता या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होईल किंवा महाराष्ट्रात यामुळे पाऊस पडेल का असा देखील प्रश्न अनेक जणांच्या मनामध्ये आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ऑक्टोबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडेल का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. नेमके या मुद्द्यावरच हवामान विभागाने काय शक्यता वर्तवली आहे हे देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे.

 ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल का?

बंगालच्या उपसागराच्या उत्तर क्षेत्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र व चक्रीवादळ तयार झाले असून ते महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता नाही व त्यामुळे ऑक्टोबर व डिसेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस देखील पडणार नाही असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

तसेच दक्षिण भारताचा विचार केला तर तामिळनाडू व आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकच्या बऱ्याच भागांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ईशान्य मान्सून कार्यरत असतो. परंतु यावर्षी तो देखील सरासरी इतकाच होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

या ईशान्य मान्सूनचा प्रभाव आणि चक्रीवादळ यामुळे महाराष्ट्रात एखाद्या वेळी अवकाळी पाऊस होतो. परंतु यावर्षी याची शक्यता खूपच कमी आहे. दक्षिणेमध्ये तो सामान्य राहिल असा देखील अंदाज आहे. दुसरे म्हणजे अरबी समुद्रात देखील केरळ राज्यातील कोचीन अल्लेपी अक्षवृत्त दरम्यान लक्षद्वीप बेटांच्या  पश्चिमेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे 26 ऑक्टोबर नंतर चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे व ते ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही असे देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.