IMD Rain Alert In Maharashtra : महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार कोसळधारा! पुढील ५ दिवस या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Rain Alert In Maharashtra : महाराष्ट्रासह देशातील नेक राज्यांमध्ये मान्सूनची जोरदार एन्ट्री झाली आहे. तसेच मान्सून जरी यंदा उशिरा दाखल झाला असला तरी तो मुसळधार कोसळत असल्याचे चित्र महाराष्ट्राच्या अनके जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील मुंबईमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच आता शेतकरी खरीप हंगामाच्या पिकासाठी शेतीची कामे करू शकतात. पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांना पेरणी करण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील कोकण, पुणे आणि विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खालील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, मुंबई, पुणे, नागपूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये पाऊस सक्रिय झाला आहे. पुढील तीन ते चार तासांत मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाला असाल तरी अद्याप देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून हळूहळू सक्रिय होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून 30 जूनच्या आसपास दिल्लीमध्ये पोहोचतो मात्र यंदा दिल्लीमध्ये मान्सून ५ दिवस आधीच दाखल झाला आहे. मुंबईमध्ये मान्सून जवळपास दोन आठवडे उशिरा दाखल झाला आहे.

62 वर्षांनंतर मान्सून दिल्ली-मुंबईत एकत्र दाखल

यंदाच्या मान्सूनवर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये जवळपास २ आठवडे उशिरा मान्सून दाखल झाला आहे. मात्र मान्सून दाखल होत असताना मुंबई आणि दिल्लीमध्ये सोबतच दाखल झाल्याचे ६२ वर्षानंतर पाहायला मिळाले आहे. 21 जून 1961 रोजी मुंबई आणि दिल्लीत सोबतच मान्सून दाखल झाला होता.

पुढील २४ तासांत देशभरात हवामान कसे राहील

ओडिशा आणि झारखंडमध्ये 25 आणि 26 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये 25 जून, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये 25 ते 28 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

25-28 जून दरम्यान हिमालयीन भागात आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत देशातील अनेक राज्यामध्ये मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.