Monsoon Update News : आनंदाची बातमी! मान्सूनची केरळमध्ये एन्ट्री, महाराष्ट्रात या दिवशी होणार दाखल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update News : देशभरातील अनेक राज्यांमधील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. नागरिक आतुरतेने मान्सूनची वाट पाहत आहेत. आता मान्सूनची केरळमध्ये दिमाखात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो.

भारतीय हवामान खात्याकडून मान्सून ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे. नैऋत्य मौसमी मान्सून जवळपास १ आठवड्याच्या विलंबाने केरळमध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची सामान्य तारीख ही १ जून आहे.

हवामान विभागाकडून मान्सून लवकरच देशभरातील अनेक राज्यामध्ये पसरेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच देशभरातील राज्यांमध्ये विविध तारखेला मान्सून पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येत्या दोन दिवसांत या भागात मान्सून दाखल होणार आहे

हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की नैऋत्य मान्सून पुढे सरकण्याची अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लवकरच मान्सून सर्वदूर पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील ४८ तासांत मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल आहे.

या दिवशी महाराष्ट्रात धडकणार नैऋत्य मान्सून

महाराष्ट्रातील तापमानात देखील यंदा चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक देखील उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र आता लवकरच महाराष्ट्रातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

कारण हवामान खात्याच्या माहितीनुसार १० जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातून बिहारच्या सीमेवर लवकरच मान्सून धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

तसेच हाच मान्सून पुढे सरकत १५ जूनला गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये पोहोचेल. दुसरीकडे, 20 जून रोजी ते गुजरातच्या अंतर्गत भागात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात पोहोचेल.

तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार 25 जूनपर्यंत हिमाचल, उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये नैऋत्य माणूसन धडकण्याची शक्यता आहे. राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये हाच मान्सून 30 जून रोजी दार ठोठावेल आणि ८ 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशभर पसरेल अशी शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.