राहुरी : ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१.३१ टक्के मतदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर काल उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात काल शुक्रवारी झालेल्या एकूण ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१.३१ टक्के मतदान झाले. ९० हजार ३९२ मतदारांपैकी ७३ हजार ५०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी ३८ हजार ८७४ पुरूष तर ३४ हजार ६३० महिला मतदारांनी मतदान केले. तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या ३६६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

१६८ केंद्रांपैकी ८ केंद्रांतील ५२ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नावाने पहिल्यांदाच वांबोरीत निवडणूक लढविण्यात आली.

तर शिवेसना आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले गटाचा या निवडणुकीत मागमूसही नव्हता. दरम्यान मतदान प्रक्रिया तर पडली आहे, आता सर्वांच्या नजरा निकालावर लागून आहे.

Leave a Comment