कॉंग्रेस सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना 5000 मासिक भत्ता : सत्यजित तांबे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : बेरोजगारी हा सामाजिक प्रश्न असून युवकांची होणारी सामाजिक कुचंबना, महागाई, वाढीव शुल्क यामुळे पालकांवरील अवलंबित्व लक्षात घेता, राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळण्याच्या किमान 02 वर्षेपर्यंत दरमहा 5000 रु. बेरोजगार भत्ता देण्याचे आमच्या सरकारचे धोरण असेल असेही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

सरकारी पद भरतीचा विषय राज्यभर तापलेला असताना, सरकारबद्दल विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी आहे. महाराष्ट्र युवक कॉंग्रेसने आपल्या स्वतंत्र जाहीरनाम्यात या धोरणांवर भर दिला असल्याने त्याला परीक्षार्थीकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र युवक कॉंग्रेस युवकांचा जाहीरनामा ५ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करत असून त्यात बेरोजगारीच्या प्रश्नांचा प्राधान्याने उल्लेख असल्याची माहिती महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

Leave a Comment