आई – वडिलांच्या पराभवांचा वचपा काढला, राहुरीत प्राजक्त पर्वाला सुरुवात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी  – नगर जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल राहुरी मतदार संघात लागला असून २५ वर्षापासून आमदारकी भूषविणारे भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचा सुमारे २२ हजार हुन अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला आहे.


या ठिकाणी राहुरीचे नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे युवा उमेदवार प्राजक्त दादा तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचे वडील मा. आ प्रसाद तनपुरे यांचा २००९ आणि प्राजक्त यांच्या मातोश्री सौ. उषाताई तनपुरे यांचा २०१४ साली कर्डिले यांनी पराभव केला होता.

आई – वडिलांच्या या दोन पराभवांचा प्राजक्त तनपुरे यांनी २०१९ ला कर्डिंलेंचा पराभव करुन एकप्रकारे वचपा काढला आहे निवडणुकीच्या सुरुवातीला आपण लाख मताधिक्क्याने निवडून येवू, असा आत्मविश्वास कर्डिले यांना होता. मात्र राहुरी तालुक्याची अस्मिता जागृत होवून यंदा राहुरीचाच आमदार करायचा असे वारे राहुरी तालुक्यात वाहिले.

या वाऱ्याचे रुपांतर मतपेटीत वादळात झाल्याचे आज दिसले. राहुरी तालुका व शहरात झालेल्या सुमारे सव्वा लाख मतदानापैकी तव्वल ८० हजार मतदान तनपुरेंना पडले . जवळपास ४० हजाराचा लिड राहुरी तालुक्यातून मिळाल्याचे दुपारपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून आले.

त्यामुळे ‘राहुरीचा आमदार झाला पाहिजे’ या वादळाने कर्डिले यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला आहे. कर्डिले १० वर्षापासून राहुरी मतदार संघाचे आमदार होते. तत्पूर्वी नगर – नेवासा मतदार संघातून ते १५ वर्ष आमदार होते.

असे २५ वर्ष आमदार राहिलेल्या कर्डिलेंचा पराभव हा जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक पराभव मानला जात आहे.

Leave a Comment