स्वबळावर निवडणूक लढवणार : माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  भिंगार शहरात भाजपची संघटनात्मक निवडणूक बिनविरोध झाली आहे. शहरात भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे लवकरच होणारी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे.

प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार दिले जाणार आहेत. केंद्र सरकारकडून भिंगार शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन सुवेंद्र गांधी यांनी केले.

भाजपच्या भिंगार शहराध्यक्षपदी वसंत राठोड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षनिरीक्षक श्रीकांत साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

या वेळी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, नगर शहर सरचिटणीस किशोर बोरा, भिंगारचे मावळते शहराध्यक्ष शिवाजी दहीहंडे, शुभांगी साठे, गणेश साठे, वैशाली कटोरे उपस्थित होते.

नूतन शहराध्यक्ष राठोड म्हणाले, सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा भिंगारच्या शहराध्यक्षपदी निवड केली आहे. पक्षाची ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाणार आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment