सरयू नदी किनारी तब्बल ‘इतकी’ मीटर उंच राम मुर्तीची स्थापना होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणीचा बऱ्याच वर्षांपासूनचा खटला निकाली निघाल्यानंतर आता राम मंदिर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्येत सरयू किनारी होत असलेल्या राममंदिरात रामाची भव्य मूर्ती स्थापण्यात येणार आहे.

देशातली सर्वात उंच राममूर्ती निर्माण करण्याची जबाबदारी मराठमोळ्या राम सुतार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. २५१ मीटर उंच अशी ही रामाची मूर्ती असणार आहे.

राम जन्मभूमीच्या वादग्रस्त जागेवर हिंदूंचा हक्क सांगत ही जागा राम मंदिरासाठीच देण्यात आली आहे. तीन महिन्यांमध्ये आत ट्रस्टची स्थापना करण्यात यावी असे आदेशही न्यायालयाने दिले होते.

साऱ्या देशाचं लक्ष लागेल्या या निर्णयाच्या सुनावणीनंतर राजकीय वर्तुळात त्याचे प़डसाद उमटल्याचं पाहायला मिळालं.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

Leave a Comment