साखर कारखान्यात जुन्या वादातून ‘राडा’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / नेवासा : ज्ञानेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांशी असलेल्या जुन्या वादातून मारहाण झाली. बुधवारी सायंकाळी ही घटना भेंडे फॅक्टरी येथे घडली.

या प्रकरणी परस्परविरोधात गुन्हे कुकाणे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या एकूण सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

कारखान्यातील सुरक्षा विभागाचा कर्मचारी रमेश बन्सी गरड याच्या फिर्यादीवरून शरद पोपट फुलारी, सचिन पोपट फुलारी, योगेश बाबासाहेब गव्हाणे व सोन्या गव्हाणे यांच्यावर,  तर सचिन फुलारी याच्या फिर्यादीवरून रमेश लिंगायत, सोपान खराडे व रमेश गरड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या तिघांनी आपल्याला काठी, बेल्टने मारहाण केल्याची तक्रार सचिनने केली, तर खराडे कुठे आहे, असे म्हणत मारहाण झाल्याची तक्रार गरड याने केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment