अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

१४ मे रोजी प्रामुख्याने अहमदनगर सह पुणे, नाशिक या जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

१५ मे रोजी अहमदनगर सह पुणे, नाशिक व धुळे या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ातही राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण झाली होती.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागातही पावसाने हजेरी लावली होती.

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीतील कामे वादळा अगोदरच उरकून घ्यावी. शहरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी.

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामध्ये अवकाळी पावसानं झोपडल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे.

पुढचे 5 दिवस मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment