‘या’कारणामुळे शेतकरी करणार ‘कापूस जाळा’ आंदोलन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कापसाची जर आधारभूत किमतीनुसार खरेदी झाली तर शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरते. परंतु सध्या त्यामध्ये सरकारकडून दिरंगाई होत आहे.

त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा कापूस खरेदीवाचून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ मे रोजी कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करणार आहेत.

अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांनी लाखो क्विंटल कापूस विक्रीसाठी बाजार समितीत नोंदणी केली आहे.

सिसिआय व कॉटन फेडरेशनमार्फत सुरु असलेली कापूस खरेदी अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. या गतीने सर्व लांब धाग्याचा कापूस सुद्धा मोजून होणार नाही.

शेतकरी संघटनेने अनेकदा खरेदी केंद्र वाढवण्याची शासनाकडे मागणी केली आहे. मात्र शासनाने त्याचा विचार केलेला नाही. सिसिआयच्या एफएक्यू ग्रेडमध्ये लांब, मध्यम व आखूड अशा तीन प्रती आहेत.

मात्र शासनाने फक्त लांब धाग्याचाच कापूस विकत घेण्याचे आदेश दिले असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस मातीमोल भावाने विकावा लागत आहे. शासकीय खरेदीचा वेग पहाता पावसाळ्यापूर्वी सर्व कापूस खरेदी होण्याची शक्यता नाही.

त्यासाठी शासनाने, आवश्यक तेथे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करुन शासकीय खरेदी सुरु करावी. किंवा शेतकऱ्यांनी मालकाला किंवा व्यापाऱ्याला विकलेला कापसाच्या व आधारभूत किमतीच्या फरकाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करुन भावांतर योजना राबवावी.

शासनाच्या चालढकल वृत्तीचा मोठा आर्थिक फटका राज्यातील कापूस उत्पादकांना सोसावा लागणार आहे.शासनाच्या या हलगर्जीपणाचा निषेध करण्यासाठी, राज्याच्या कापूस उत्पादक जिल्ह्यात २२ मे रोजी सकाळी ११ वाजता, कापूस उत्पादक शेतकरी आपल्या घरासमोर मूठभर कापूस जाळून शासनाचा निषेध करतील, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment