पोलीस अधिकारीही कोरोनाच्या विळख्यात; महिला IPS अधिकारी कोरोनाग्रस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-पोलीस प्रशासन सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड मेहनत घेत आहे. परंतु या युद्धात मात्र त्यांनाही कोरोनाने विळख्यात घेतले आहे. आता पोलीस अधिकारीही यापासून लांब राहिले नाहीत.

दिल्ली पोलीस दलात कार्यरत असलेली महिला IPS अधिकारी कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. या महिला DCP अधिकाऱ्यांसह त्यांच्यासोबतच्या ३ पोलिसांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या दिल्ली पोलीस दलातील बऱ्याच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

यात दोन आयपीएस अधिकारी, 2 वरिष्ठ अधिकारी आणि 450 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उत्तम नगर, नॉर्थ एवेन्यू, फर्श बाजार, जामिया नगर, लाजपत नगर आणि नंद नगरी या भागातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पोलीस दलात कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागणारं दिल्ली हे महाराष्ट्रानंतरचे दुसरे राज्य आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनामुळे 12 हून अधिक पोलिसांचा मृत्यू झाला आहे,

दिल्लीत मात्र आत्तापर्यंत एकाच पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीतील 100 हून अधिक पोलीस हे कोरोनाशी यशस्वी लढा देऊन त्यांच्या घरी परतले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment