माजी मंत्री कर्डीले यांची विखे कुटुंबियांवर स्तुतीसुमने; म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- राजकारणात कधीच काही स्थायी स्वरूपात राहत नाही. मग तो राग, द्वेष, शत्रुत्व असो कि प्रेमं असो. याची अनुभूती येण्याचे कारण म्हणजे नुकतीच माजी मंत्री कर्डीले यांची विखे कुटुंबियांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

विखे पाटील कुटुंबाने जिल्ह्यात संकटाच्या काळात देखील नेहमी सहकार्याची भूमिका घेतली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी केले.

काही महिन्यांपूर्वी राजकीय शत्रुत्व दाखविणारे ही मंडळी पुन्हा एकाच व्यासपीठावर आली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या संसर्गामुळे विळद घाट येथे दिवंगत श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या 200 बेडच्या कोविड हॉस्पिटलच्या लोकापर्ण कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री कर्डिले बोलत होते.

यावेळी आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, आयएमचे नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. आठरे आदी उपस्थित होते. यावेळी आ.विखे पाटील म्हणाले,

प्रवरा येथे 100 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू केले होते. आता ते 200 करण्याचा मानस आहे. त्याचधर्तीवर मातोश्री स्वर्गीय सिंधुताई विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विखे पाटील हॉस्पिटल येथे 200 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे.

करोनाच्या संकटाची व्यप्ती ही मोठी आहे. सध्या ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहे. सध्या अनेक जण जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे.

आता सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जनतेमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment