जिल्ह्यात कोरोनाने आणखी आठ जणांचे बळी घेतले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने आणखी आठ जणांचे बळी घेतले. चोवीस तासांत आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या २४० झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत नवे ५१९ रुग्ण आढळून आले असून बाधितांची एकूण संख्या १७ हजार ५८३ झाली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते.

२१ जूनपासून रुग्णसंख्या वाढू लागली. सध्या दररोज ४०० च्यापुढे रुग्ण आढळून येत आहेत. मृत्यूचे प्रमाणदेखील सातत्याने वाढत आहे. रविवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सायंकाळी सहापर्यंत रुग्णसंख्येत ५१९ ने वाढ झाली.

त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ३८९ झाली. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९१, अँटीजेन चाचणीत २८३ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४५ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ६१, संगमनेर १, पाथर्डी १२, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट २, श्रीगोंदे १, पारनेर १ आणि इतर जिल्हा १ रुग्णाचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा ५८, संगमनेर १७, राहाता १५, पाथर्डी १७, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट १६, नेवासे ११, श्रीगोंदे ३२, पारनेर ८, अकोले २७, शेवगाव ३, कोपरगाव ४०, जामखेड २३ आणि कर्जतच्या १४ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा ९३, संगमनेर ४, राहाता ५, पाथर्डी १, नगर ग्रामीण १४, श्रीरामपूर ४, कॅन्टोन्मेंट १, नेवासे २, पारनेर ४, अकोले १, राहुरी ६, कोपरगाव ५, जामखेड ४ आणि कर्जतच्या १ रुग्णाचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment