असंघटित कामगारांचा आत्मदहनाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-बहुजन असंघटित कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात मागील सहा दिवसापासून असंघटीत बांधकाम कामगारांच्या प्रश्‍नासंदर्भात उपोषण सुरु आहे.

भर पावसात उपोषण सुरु असून, प्रशासन याची दखल घेत नसल्याने उपोषण कर्त्यांनी शुक्रवारी (दि. 25) आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

असंघटीत बांधकाम कामगारांना कोरोनाच्या संकटकाळात शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत, घरकुल, मुलांना शिष्यवृत्ती व इतर लाभ मिळण्यासाठी कामगारांची नोंदणी व नूतनीकरण सहाय्यक कामगार आयुक्त

कार्यालयाकडून ऑफलाइनपद्धतीने करण्याच्या मागणीसाठी बहुजन असंघटित कामगार संघटनेचे उपोषण सुरु आहे. असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे उपोषण सुरु असून याकडे प्रशासन डोळे झाल करीत असल्याचा आरोप प्रदेश सचिव उमाशंकर यादव यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment