दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या फेर परीक्षेचे (पुरवणी परीक्षा) वेळापत्रक राज्य मंडळाने जाहीर केले आहे.

त्यानुसार इयत्ता बारावीची आणि दहावीची फेरपरीक्षा एकाच दिवशी दि. २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा १८ नोव्हेंबर ५ डिसेंबर या काळात होतील.

बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या दरम्यान होणार आहेत. फेरपरीक्षा एकाच दिवशी सुरू होणार असल्या

तरीही दहावीच्या पाच डिसेंबरला संपणार असून, बारावीची फेरपरीक्षा दहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे. असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment