या तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला चार हजारांचा टप्पा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे, तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. मात्र नुकतीच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

दरम्यान संगमेनर तालुक्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी ४ हजार ३० इतकी झाली आहे. मात्र पूर्वीप्रमाणे रुग्णसंख्या वाढत नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये एक दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५१५००

उपचार सुरू असलेले रूग्ण: १८४१

मृत्यू:८३५

एकूण रूग्ण संख्या:५४१७६

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment