सेटिंगबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- नेवासे तालुक्यातील पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल संभाजी गर्जे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्यातील सेटिंगबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने तालुक्यात, तसेच पोलिसांमध्ये खळबळ उडाली.

आता दबक्या आवाजात विविध प्रश्न पुढे येत आहेत. राजकीय प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. या क्लिपमुळे राठोड यांची उचलबांगडी झाली, तसेच त्यांच्या विशेष पथकातील आठ जणांवर निलंबनाची कारवाई झाली.

त्यानंतर २४ तासांनी गर्जे यालाही निलंबित करण्यात आले. नेवाशाचे पोलिस निरीक्षक डेरे यांची याआधीच मुख्यालयात बदली झाली आहे.

ऑडिओ क्लिप कोणी व्हायरल केली? व्हायरल करणाऱ्यांचे नेमके टार्गेट कोण? उत्तरेतील बाई, मोठ्या हस्ती, पोलिस निरीक्षक डेरे की, राठोड? असे प्रश्न चर्चिले जात आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment