‘अर्णव गोस्वामीच्या अटकेनंतर तरी अन्वय नाईकला न्याय मिळणार का ?’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले.

गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, पालघर येथील साधू हत्या, कंगना रानौत आणि राज्य सरकारमधील वाद आदी मुद्यांवर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी अटक केली.

वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचे नाव असल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केला होता.

अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं. आता याचप्रकरणी अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आल्यानंतर अन्वय नाईकला तब्बल अडीच वर्षानंतर तरी न्याय मिळणार का?

असा सवाल निर्माण होत आहे. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पत्रातून केला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment