Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- शेततळ्यात बुडून धनंजय दादाभाऊ आगलावे (२२) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी २ वाजता गुंजाळवाडी पठार येथे घडली. आगलावे यांच्या घरामागे शेततळे आहे.

धनंजय गायींना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरून आत पडला. पोहता येत नसल्याने तो बुडाला.

नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शिवप्रसाद दिवेकर यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button