खासदार डॉ. सुजय विखे म्हणतात हीच खरी संपत्ती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-उपेक्षितांचे आशीर्वाद हीच खरी मौलिक संपत्ती आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी एसएनआरच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमात प्रवरा परिवार खंबीरपणे पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

कर्जत येथे एसएनआर लघु व मध्यम उद्योग विकास समूहाच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून “आपले गाव, आपला रोजगार “या योजनेचा शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते

यावेळी भामाबाई राऊत, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत, भाजपचे शहराध्यक्ष वैभव शहा यांच्यासह अनेक महिला या वेळी उपस्थित होत्या.

यावेळी खा सुजय विखे म्हणाले की महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि सबलीकरणासाठी घोषणाबाजी करणे सोपे, कृती करणे अवघड आहे. त्यासाठी आवश्यक ते भांडवल, मनुष्यबळ आणि इच्छाशक्ती लागते ती नामदेव राऊत यांच्या माध्यमातून या प्रकल्पाद्वारे कृतीत उतरली जात आहे.

Leave a Comment