खुशखबर… तर लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होतील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या दराने प्रति लिटर शंभरी गाठली आहे.

या दरवाढीची झळ सर्वसामान्य जनतेला सोसावी लागत आहे. सामान्य ग्राहकांवरचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याच्या विचारात आहे.

सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते.

महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो.

पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावा असा सल्ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की होते की, “इंधनाच्या वाढत्या किंमती या ग्राहकांवर परिणाम करतातच, त्याचसोबत सर्वच क्षेत्रावर त्यांचा परिणाम होतो.

केवळ बाईक वा कार मालकांच्यावर याचा परिणाम होत नसून त्याचा परिणाम उत्पादन क्षेत्र, वाहतूक आणि इतरही क्षेत्रावर पडतोय.

” दरम्यान, केंद्र सरकार इंधनावरील उत्पादन शुल्क (excise duty) कमी करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे.अर्थमंत्रालय त्यावर सकारात्मक विचार करत असून राज्ये, तेल कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा करत आहे.

त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 60 टक्के कर आहे. सुमारे 36 रुपये प्रति लिटर दराने भारतात येणारे पेट्रोल दिल्लीत सुमारे 91 रुपयांनी विकले जात आहे, म्हणजे जवळपास 55 रुपये यावर कर लागत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर