पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घटली…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  कोरोना संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना चा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बसला असून त्यांची लोकप्रियता घातली आहे.

अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्व्हेक्षणात मोदींचे गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरलं आहे. गुणांकनात घट झालेली असली तरी अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांनि मोदी यांनी मागे टाकलं आहे.

या सर्व्हेक्षणात २१२६ भारतीयांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं अशी माहिती दिली आहे. यानुसार ६६ टक्के भारतीयांना मोदींची बाजू घेतली असून २८ टक्के लोकांना मोदींविरोधात मत नोंदवलं आहे.

यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ६६ टक्क्यांसोबत पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी ६५ टक्क्यांसोबत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीचा क्रमांक आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ५३ टक्क्यांसोबत सहाव्या क्रमांकावर आहेत. २०१९ मध्ये जेव्हा मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा हे गुणांकन ८२ टक्के होतं.

इतर नेत्यांचशचे गुणांकन –

  • मारियो ड्रॅगी (इटली) – ६५ टक्के
  • एंड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर (मेक्सिको) – ६३ टक्के
  • स्कॉट मॉरिसन (ऑस्ट्रेलिया) – ५४ टक्के
  • अँजेला मार्कल (जर्मनी) – ५३ टक्के
  • जो बायडन (अमेरिका) – ५३ टक्के
  • जस्टिन ट्रूडो (कॅनडा) – ४८ टक्के
  • बोरिस जॉन्सन (युके) – ४४ टक्के
  • मून जे-इन (दक्षिण कोरिया) – ३७ टक्के
  • पेड्रो सांचेज़ (स्पेन) – ३६ टक्के
  • जायर बोल्सोनारो (ब्राझील) – ३५ टक्के
  • इमैनुएल मॅक्रॉन (फ्रान्स) — ३५ टक्के
  • योशीहिदे सुगा (जपान) – २९ टक्के