अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-सध्या ठिकठिकाणी साप, नाग आदी निघण्याचे प्रमाण तुलनेने थोडे जास्त आहे. अतिवृष्टी हे यामागचे कारण असावे असे जाणकारांचे मत आहे. अशीच एक घटना शहरातील एमआयडीसी परिसरात घडली.
येथील एका कंपनीत बिळात जाऊन बसलेला 12 फुटी अजगर (इंडियन रॉक पायथन) रात्री आढळून आला. सर्पमित्र युसूफ बशीर खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मध्यरात्री कंपनीत जाऊन मोठ्या कौशल्याने सदर अजगर पकडला.
रात्री घुशीचा शिकार केल्याने तो सुस्त बसला होता. हा अजगर पकडल्यानंतर तो 12 फुटी व 15 ते 20 किलो वजनाचा असल्याचे निदर्शनास आले.
अजगर पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसर्या दिवशी युसूफ खान यांनी वन अधिकारी थिटे व शर्मिले यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गात मुक्त करण्यात आला. यावेळी अली खान हा देखील उपस्थित होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved