वाढता रोगप्रसार थांबविण्यासाठी लसीकरणावेळी सुई बदला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- आजारी व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले कि, डॉक्टर इंजेक्शन देतात व संबंधित रुग्णाला टोचलेली सुई फेकून देतात, जेणेकरून रोगाचा प्रसार होऊ नये, अशाच पद्धतीने जनावरांना देखील एकदा वापरलेली सुई दुसऱ्यांदा वापरू नये याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील काही खासगी पशुवैद्यकीय व खासगी सेवादाता जनावरांच्या लसीकरणावेळी तसेच उपचार करतांना सुया न बदलता एकच सुई वापरतात, परिणामी रोगप्रसार वाढतो. त्यामुळे यापुढे लंपी त्वचा रोगाच्या लसीकरण किंवा इतर उपचारावेळी एक सुई एकदाच वापरावी व सुयांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी,

अशा सूचना जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीच्या सभेत देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीची आँनलाईन सभा शुक्रवारी सभापती सुनील गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत सदस्य संध्या आठरे, सोनाली रोहणारे, शांताबाई खैरे, दिनेश बर्डे, वंदना लोखंडे, रावसाहेब कांगुणे, सुनीता दौंड, तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाँ. सुनील तुंभारे यांनी सहभाग घेतला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment