Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील धर्मांतर प्रकरणाची राज्यात चर्चा,आतापर्यंत सात आरोपींना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : उंबरे येथील आणखी दोन अल्पवयीन मुलींनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग, लग्न व धर्मांतर करण्यासाठी सोशल मीडियाद्वारे बदनामी करण्याची धमकी देणे याबाबत नऊ जणांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे उंबरे येथील घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्यांची संख्या तीन झाली आहे. आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उंबरे येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. घटनेचे गांभीर्य आणि सर्वच स्तरातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होताच पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अल्पवयीन मुलगी असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी दवाखान्यात उपचार घेत आहे. एक जण अद्याप पसार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

अटक केलेल्या आरोपीत अल्ताफ बाबूलाल शेख (वय ३५), कैफ जिलानी शेख (वय १९) शाकीर यासीन सय्यद (वय २५), हिना मुस्ताक पठाण (वय- ३३), सलीम पठाण (वय ४५) सोहेल शेख, हुसेन ऊर्फ भैय्या शेख (सर्वजण रा. उंबरे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आवेज निसार शेख असे उपचार घेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

हिना शेख हिच्याकडे खासगी शिकवणीला गेल्यावर आरोपी आवेज व कैफ वारंवार पाठलाग करून, अडवीत होते. लज्जा उत्पन्न होईल. असे वर्तन करीत होते. मैत्री, लग्न व धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकीत होते.

इतर आरोपी त्यांना साथ देऊन, प्रवृत्त करीत होते. फोटो काढून सोशल मीडियाद्वारे व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत होते. असे म्हटले आहे. दरम्यान एकाच गावातील अल्पवयीन मुलींनी चार दिवसांत तीन गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली.