रोहित पवारांच्या ‘जय श्रीराम’ची चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दसऱ्याला आफल्या मतदारसंघात होणाऱ्या रावण दहनानिमित्ताने ‘जय श्रीराम’ असे ट्विट केले आहे.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शनिवारी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेटही चर्चेत आहे.

आमदार रोहित पवार यांनी रावण दहन कार्यक्रमानिमित्त ‘जय श्रीराम’ असे ट्वीट केले आहे. सोमवारी, ३ ऑक्टोबरला खर्डा येथे महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहनाचा कार्यक्रम रोहित पवार यांनी आयोजित केला आहे.

रामायण मालिकेत सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया या खर्डा येथे रावण दहन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. याआधी रोहित पवार यांनी अयोद्धा दौरा केला होता.

रोहित पवार यांची भूमिका भाजपच्या जवळपास जाणारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याची माहिती देण्यासाठी पवार यांनी सुरवातीला केवळ जय श्रीराम असे ट्विट केले.

त्यांच्या फोटोसह जय श्रीराम पाहून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरवाती केली. त्यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करून कार्यक्रमाची माहिती दिली. त्यातून जय श्रीरामचा खुलासा झाला असला तरी यावरून सुरू झालेल्या चर्चा सुरूच आहेत.