थकबाकी न दिल्यास या कारखान्यास गळीत हंगाम परवानगी देऊ नका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-शेतकर्‍यांचे ऊसाचे पैसे अदा केल्याशिवाय माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांच्या हिरडगाव येथील खाजगी साईकृपा कारखान्याला गाळप परवाना देण्यात येऊ नये अशी मागणी बाळासाहेब नाहाटा व टिळक भोस यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.

मोठ्या अडचणीतून विक्रम पाचपुते यांनी हा कारखाना आठ दिवसांत सुरू करणार असे या पूर्वी जाहीर केले आहे. तशी पूर्व तयारी सुद्धा त्यांनी केली आहे.

त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व संभाजी ब्रिगेड नगर दक्षिण चे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे भेट घेवून.

साईकृपा हिरडगाव च्या विरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला आहे. त्यावर साखर आयुक्त यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना फोन करून

कारखान्याची तातडीने लिलावाची प्रक्रिया पूर्ण करा अशा सूचना दिल्या असल्याचे नाहाटा/भोस यांनी सांगितले. मागीलसर्व थकबाकी न दिल्यास या वर्षी गळीत हंगामास परवानगी देऊ नका अशी मागणी करण्यात आली आहे.

तरीही साईकृपा चालू झाल्यास साखर आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करू, मात्र शेतकर्‍याचे पेमेंट मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका नाहाटा-भोस यांनी व्यक्त केली.