सकाळी माजी आमदार तर रात्री विद्यमान मंत्री..! नगर तालुक्यातील ‘या’ गावात झाली ‘राजकीय खिचडी’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  नगर तालुक्यातील जेऊर या गावात एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे.राजकारणात सद्यस्थितीत ‘खिचडी’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील अनेक कार्यकर्ते विविध कामासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची भेट घेतात.

त्यांच्याकडून हारतुरे घेतल्यानंतर तेच कार्यकर्ते नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या दौऱ्यात खांद्याला खांदा लावून फिरताना दिसतात.

दिवसा माजी आमदार कर्डिले यांच्याकडे तर रात्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या तंबूत, अशी या कार्यकर्त्यांची ओळख गावामध्ये झाली आहे.

या चाप्टर कार्यकर्त्यांकडून आम्ही तुमचेच कार्यकर्ते असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न दोन्ही नेत्यांसमोर सुरू आहे. अशा कार्यकर्त्यांना ग्रामस्थ चांगलेच ओळखून आहेत.

यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्यांचाही समावेश असल्याने ग्रामस्थ अचंबित होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सर्व सदस्यांचे मनोमिलन घडवून आणत ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या ताब्यात ठेवली.

ग्रामस्थांनी तसेच कर्डिले समर्थकांनी सरपंच, उपसरपंच पदाबाबत गृहीत धरलेले अंदाज फोल ठरले गेले. त्यानंतर या गावात सुरू झाले ते जिरवा जिरवी तसेच अंतर्गत वादाचे राजकारण.