लॉरेन्स स्वामी अडचणीत, पोलिसांनी केले असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-भिंगार टोलनाक्याच्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध मोका कायद्यां द्वारे कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

ज्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक मोका कायद्यानुसार प्रस्ताव दाखल झालेला आहे, त्या आरोपींमध्ये लॉरेन्स स्वामी, राहणार भिंगार. प्रकाश भिंगारदिवे,राहणार निंबोडी. संदीप शिंदे, राहणार बुरुडगाव.

विक्रम गायकवाड, राहणार वाळुंज. बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव, राहणार वाळुंज. संदीप वाकचौरे, रा. दरेवाडी. अर्जुन डूबे, राहणार दरेवाडी व बाळासाहेब भिंगारदिवे यांचा यामध्ये समावेश आहे नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये संघटित गुन्हेगारी वाढत चालली आहे. अनेक गुन्हे प्रलंबित आहेत.अनेक ठिकाणी आरोपी निष्पन्न होऊन वारंवार पुन्हा पुन्हा गुन्हे करण्याचे प्रकार घडत चाललेले आहेत.

त्यामुळे ज्यांच्यावर अधिकाधिक गुन्हे आहे, त्याची माहिती काढण्यास गेल्या दोन महिन्यापासून सुरुवात झालेली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अगोदर सुद्धा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशांवर तडीपारीचे अथवा मोक्कांतर्गत कारवाई चे प्रस्ताव दाखल करून कारवाई केली जाईल, असे सूतोवाच केले होते भिंगार येथील उद्योजक लॉरेन्स स्वामी याचा भिंगार येथील टोल नाका तोडफोड प्रकरणांमध्ये समावेश असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी कारवाई करून आठ तासाच्या कारवाईनंतर स्वामी याला अटक केली होती त्याला सध्या पोलीस कोठडी मिळालेली आहे.

लॉरेन्स स्वामीसह अन्य काही आरोपींचा या टोळीमध्ये समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.या आरोपींविरुद्ध 10 ते 12 गुन्हे दाखल असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोका कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Leave a Comment