आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील या ठिकाणची सरपंच निवडणूक पुढे ढकलेली!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. तसेच सरपंच पदाचे आरक्षण देखील घोषित करण्यात आले आहे.

त्यामुळे आता सरपंच पदाची माळ कोणा कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मात्र आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघातील जामखेड तालुक्यातील बिनविरोध झालेल्या वाकी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक व साकत ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड पुढे ढकलल्याने ४७ ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड होत आहे.

त्यानुसार दि. ९ रोजी २४ ग्रामपंचायतच्या सरपंच निवडणूक होणार गावे अशी आहेत कुसडगाव, देवदैठन, सोनेगाव, पाटोदा, तेलंगसी, डोणगाव, पाडळी, चोंडी, धानोरा, अरणगाव, नायगाव, नाहुली, दिघोळ, पोतेवाडी, खर्डा, पिंपळगाव आळवा, पिंपळगाव उंडा, कवडगाव, जातेगाव, चोभेवाडी, सातेफळ, झिक्री, वाघा, मोहा.

दि.१० रोजी सरपंच निवड गावे पुढीलप्रमाणे बाळगव्हाण, मोहरी, राजेवाडी, धोंडपारगाव, घोडेगाव, खुरदैठन, तरडगाव, पिंपरखेड, धामणगाव, नान्नज, गुरेवाडी, आघी, खांडवी, जवळके, आपटी, सारोळा, लोणी, बोरले, आनंदवाडी, जायभायवाडी, बावी, सावरगाव, बांधखडक या ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी निवड होणार आहे.

Leave a Comment