कोट्यवधीची वीज चोरणाऱ्याला दिलासा नाहीच, कोर्टाने दिला हा आदेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील छत्रपती जिनींग अॅण्ड प्रेसिंग मिल या कापूस जिनींग कारखान्यातील एक कोटी ९४ लाख रुपयांची वीज चोरी भरारी पथकाने पकडली होती.

या विरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेत बिल रद्द करण्याचे आणि वीज जोडणी करून देण्याची मागणी केली होती. मात्र, भरारी पथकाची कारवाई योग्य असल्याचे सांगून न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.

वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने मिरजगावमध्ये ही वीज चोरी उघडकीस आणली व फौजदारी कारवाई केली. पडताळणीअंती ग्राहकाने एकुण १११६७४३ इतक्या युनिटची म्हणजेच रु.१,९४,८२,८५९ इतक्या रक्कमेची वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानुसार महावितरण संबंधीत कारखाना व संचालका विरुध्द विद्युत २००३ चे कलम १३५ अन्वये कर्जत पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केला होता व ग्राहकास रु.१,९४,८२,८५९ इतक्या रक्कमेचे वीज चोरीचे निर्धारण देयक देण्यात आले.

याविरुध्द कारखान्याने श्रीगोंदा येथील दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला असून महावितरण कंपनीने केलेली कारवाई सकृतदर्शनी योग्य असल्याचे म्हटले आहे.